Rahul Gandhi : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. एक केरळची वायनाड आणि दुसरी उत्तर प्रदेशची रायबरेली जागा. राहुल गांधींनी दोन्ही जागा जिंकल्या होत्या. मात्र आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. या जागेवर आता पुन्हा एकदा पोटनिवडणूक होणार आहे.
राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नियमानुसार, त्यांना एक जागा सोडावी लागली, त्यांनी सोमवारी रायबरेलीची जागा निश्चित करत वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून या पोटनिवडणुकीत काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस पक्षाच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. पहिली म्हणजे राहुल गांधींनी ती जागा निवडली जिथून गांधी कुटुंब 1952 पासून जिंकत होते. राहुल यांचे आजोबा फिरोज गांधी, आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी हे यापूर्वी रायबरेलीमधून खासदार राहिले आहेत. फिरोज गांधी यांनी 1952 मध्ये पहिल्यांदा ही जागा जिंकली होती. इंदिरा गांधी यांनी 1967 ते 1977 दरम्यान 10 वर्षे या जागेचे प्रतिनिधित्व केले. मात्र, 1977 मध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला.
Rahul Gandhi यांचा अमेठीत झाला होता पराभव
दरम्यान, 2019 मध्ये राहुल गांधींनी अमेठी आणि वायनाड या दोन मतदार संघातून निवडणूक लढली होती मात्र त्यांचा अमेठीत मतदार संघातून स्मृती इरानी यांनी पराभव केला होता तर वायनाड मधून निवडून आले होते.
हेही वाचा :
धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना
ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती
ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये