Monday, April 14, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Pune : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत मंथन फाउंडेशनचा विशेष सन्मान!

पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ, पुणे येथे २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. (Pune)

या कार्यक्रमाची थीम आणि घोषवाक्य “Yes! We Can End TB – Commit, Invest, Deliver” असे होते.

---Advertisement---


दरवर्षीप्रमाणे, क्षयरोग जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाने क्षयरोग निर्मूलनासाठी विशेष कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान केला.


मंथन फाउंडेशनला विशेष सन्मान!

मंथन फाउंडेशनने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये MDR-TB प्रतिबंधासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव मिळवला. नियमित औषधोपचार, रुग्णालयात दाखल करण्याची मदत आणि संपूर्ण उपचार प्रक्रियेत संस्थेने केलेल्या योगदानाबद्दल मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट आणि त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला. (Pune)

यावेळी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र मा. डॉ. निना बोराडे (आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी
एम. जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), डॉ. कल्पना बळीवंत, उप आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका तसेच डॉ. शिल्पा प्रतिनिधी, अधिष्ठाता, भा.स्व. अटळ बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. प्रशांत बोठे, शहर क्षयरोग अधिकारी तथा अधीक्षक, कमला नेहरू रुग्णालय, डॉ. ज्ञानेश्वर चकोर, वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग कक्ष, डॉ. इरफान लोहारे, वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग कक्ष, आशा भट्ट, अध्यक्षा, मंथन फाउंडेशन उपस्थित होते.

कार्यक्रमास विविध एनजीओ प्रतिनिधी, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune)

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली आणि क्षयरोग जनजागृतीसाठी विशेष उपक्रम सादर करण्यात आले.

सर्वांनी मंथन फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles