Wednesday, December 4, 2024
Homeजिल्हाPune : विकासाच्या मुद्द्यावर आमदार बापूसाहेब पठारे अॅक्शन मोडवर

Pune : विकासाच्या मुद्द्यावर आमदार बापूसाहेब पठारे अॅक्शन मोडवर

वडगाशेरी, पुणे : वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे विजयानंतर लगेचच विकासकामे करण्यासाठी तयारीनिशी उतरल्याचे दिसते. काल (ता. २९) अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासमवेत येरवडा, कळस येथील कचरा हस्तांतरण केंद्राची पाहणी केली. प्रामुख्याने कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही पाहणी पार पडली. कचरा व्यवस्थापनासाठी ‘इंदौर पॅटर्न’ सारख्या ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे पठारे यांनी सांगितले. (Pune)

पुढे ते म्हणाले, “रोगराईला आमंत्रण देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कठोर पावले उचलून हा प्रश्न मार्गी लावणार आहे. कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण, संकलन आणि व्यवस्थापन हे आपल्या एकूणच मतदारसंघाच्या स्वच्छतेसाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यावश्यक आहे.”

पाहणी दरम्यान, येरवडा भागातील कचरा हस्तांतरण केंद्राची सुधारून कचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळील कचरा तातडीने उचलावा, कचरा गाड्यांची वेळोवेळी देखभाल व दुरूस्ती करून पर्यायी व्यवस्थेचीही सोय करावी, कळस येथील कचरा हस्तांतरण केंद्र बदलावे इत्यादि कचऱ्यासंबंधी सूचना व आदेश पठारे यांनी दिले. (Pune)

कळस येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यामागे उघडी ड्रेनेज लाईन बंदिस्त करावी, कळस येथील शाळांमधील उद्यान मुलांसाठी वापरण्यासाठी उपलब्ध करावे, कळस येथील बॅास्केटबॅाल कोर्ट सर्व सोयी-सुविधा देऊन चालू करावे. तसेच, त्या ठिकाणी असलेले अवैध धंदे बंद करावे, कळस येथील पाण्याची टाकी दुरूस्त करावी, स. न. ११८ डीपी रस्ता लवकरात लवकर सुरू करावे, याही सूचना यावेळी त्यांनी केल्या.

आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कामाबाबत मतदारसंघातील नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे. योग्य उमेदवाराला मतदान केले असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड

ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले

PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C

PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर

संबंधित लेख

लोकप्रिय