Pune (राजेंद्रकुमार शेळके) : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला एक नंबर स्थानी अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणले गेले. सदर यशासाठी अनिवासी भारतीय विभागाने पदरचे पैसे खर्च करून पक्षासाठी तन मन धन देऊन भरीव योगदान दिले. त्यासाठी अध्यक्षा विद्या कदम व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशात ही कौतुक होत आहे. (Pune)
सर्वांना न्याय देणारे कॉंग्रेस पक्षाचे घोषणा पत्र समाजातील सर्व जाती धर्म व स्तरांवरील जनतेला समृध्द व विकसित व मानवी मूल्यांचे जतन करणारा आहे. अशी धारणा असलेल्या अध्यक्षा व ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस कॅनडा’ च्या संस्कृतिक व सामाजिक समन्वयिका (ब्रिटीश कोलंबिया) विद्या कदम व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक व्यक्तिच्या मनामध्ये काँग्रेस पक्षाला पोहोचवून, पक्ष व इंडिया आघाडीला परत देशवासियांच्या भल्यासाठी सत्तेवर आणण्यासाठी स्वखर्चाने न्यायपत्रे छापणे व घरोघरी वाटून पक्षाचा प्रचार करणे यावरच भर दिला.
त्यासाठी अनिवासी भारतीय विभागाने स्वखर्चाने ३ लाख न्याय गॅरंटी पत्रे मराठी हिंदी व इंगजी या तीन भाषां मध्ये अमरावती येथे छापली तसेच गरज लागेल त्या जिल्ह्यामधील काही ठिकाणी आदिवासी महाविद्यालयीन तरूण तरूणी, त्या विभागातील तरूण, कही ठिकाणी कॉंग्रेस चे पदाधिकारी, प्रसंगी रिक्षा वाले अशा सर्वांना प्रचारासाठी गोळा केले. त्यांना योग्य मार्गदर्शन करून व स्वखर्चाने मानधन देऊन त्यांच्या मदतीने घरोघरी ही न्यायपत्रे गॅरंटी कार्ड्स लोकांना त्याचे महत्व पटवून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमध्येही वाटली. इतकेच नव्हे तर, प्रदेश कार्याध्यक्ष मोहम्म्द एजाज यांनी या ५ न्यायपत्राच्या व्हिडिओ बनवून मतदानाच्या शेवटच्या ४ दिवशी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांमध्ये न्यूज चॅनेल वर प्रदर्शित करण्याची जबाबदारी पेलली.
राष्ट्रीय भारतीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती अनिवासी भारतीय सेल काँग्रेसच्या उमेदवारांच्या या योजनाबध्द प्रचारामध्ये प्रामुख्याने अनिवासी भारतीय विभागाच्या अध्यक्षा विद्या कदम, एन. आर. आय, विभागीय कार्याध्यक्ष अनुप हिवाळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया शाम प्रमुख ईर्शाद पठाण, सिंगापुर शाखा प्रमुख आनंद नंदकुमार यांनी तन मन धन अर्पून न्याय पत्रे बनविण्या पासून ते प्रत्येक राज्यातील जिल्हयाची टीम हाताशी धरून घरोघरी पोहोचविण्याचे कार्य केले. (Pune)
यात मोठा सहभाग अमेरिका शाखा प्रमुख काँग्रेसच्या उमेदवारांच्या या योजनाबध्द प्रचारामध्ये प्रामुख्याने अनिवासी भारतीय विभागा च्या अध्यक्षा विद्या कदम, एन. आर. आय. विभागीय कार्याध्यक्ष अनुप हिवाळे (अमेरिका), ऑस्ट्रेलिया शाखा प्रमुख ईर्शाद पठाण, सिंगापूर शाखा प्रमुख आनंद नंदकुमार यांनी तन मन धन खर्चुन न्यायपत्रे बनविण्यापासून ते प्रत्येक राज्यातील जिल्हयाची टीम हाताशी धरून घरोघरी पोहोचविण्याचे कार्य केले. यात मोठा सहभाग अमेरिका शाखा प्रमुख निशिकांत देशमुख यांनी घेतला.
त्याशिवाय एन आर आय. विभागीय सरचिटणीस ऑगस्टीन निक्सन (अमेरिका), वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष, राजकीय सल्लगार व प्रशासन प्रमुख अशोकराव जाधव (रत्नागिरी), जतीन लिंबाचिया (विरार), उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण (अमेरिका), प्रविण नाईक (माहिम), खजिनदार विनीता जाधव, पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष डॉ. मॅन्यूएल डिसूझा, सरचिटणीस राजेंद्र शेळके व सचीव जॅकलिन फॉस्टर (पूणे), प्रदेश सरचिटणीस राजेश भोसले, अॅड, योगिता सावंत व शबाना शेख, प्रदेश सचीव अपराजिता छापडिया व संजीव अहिरे, योगेश साठे वसुहास शिंदे (मुबई), औरंगाबद जिल्हा प्रमुख अल्तफ सय्यद, कोल्हापूर जिल्हा प्रमुख मानव तिवडे, कार्यकारी सदस्य सोनिया आगा व मुस्तकीम शेख त्याशिवाय सल्लागार समिती सदस्य देवेंद्र गरछा, (कॅनडा), राजीव गौडा (अमेरिका), मोहमद युसूफ खान (टी), उम्मीद मोहम्मद (दुबई), महफूस आलम (टर्की समन्वयक), सुनील सरदार व जितेंद्र पुरी (भोपाळ), सुनील बोरसे (मध्य प्रदेश) शेजिन माथर (केरळ), करी कलम आलम (दिल्ली) यांचे या प्रचार कार्यात अध्यक्षा विद्या कदम यांच्या बरोबर फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये ही खूप मोठे सहकार्य लाभले. (Pune)
या सर्वांनी अनिवासी भारतीय विभागातर्फे अमरावतीमध्ये मराठी, हिंदी व इंग्लीश भाषांमध्ये छापलेली ३ लाख न्यायपत्रे अमरावतीमधून कोल्हापूर, अमरावती, जालना धुळे व मालेगाव, मुंबई, खांडवा, प्रयागराज, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, बनारस, चंदीगढ़, लुधियाना, जालंदर, गुरुदासपूर, नूरपूर बेदी, डिंगरिया, आनंदपूर या जिल्हयांमध्ये व गावंमध्ये अमरावतेतून ट्रॅव्हल बस मार्फत इतर राज्यातील जिल्हयांमध्ये पाठवून त्या त्या मतदार संघात तेथील नेत्यांना विश्वासात घेऊन तरूण तरूणींची टीम तयार केली व त्यांच्या मार्फत त्यांना स्वखर्चाने योग्य मानधन देऊन घराघरात वाटली.
या सर्वांच्या स्वखर्चाने केलेल्या आणि अथक परिश्रमाने केलेल्या सामुहिक कामाचे फलित म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय होय असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काढले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही अध्यक्षा विद्या कदम व त्यांच्या या टीम ने पक्षाला दिलेल्या या बहुमोल कार्याच्या योगदानाचे खूप कौतुक केले.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय