पुणे : वाघोली येथील जेएसपीएम युनिव्हर्सिटीमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलीजेंसमध्ये एम. टेकचा विद्यार्थी असलेल्या अजित भदोरियाला द. कॅरोलिना स्टेट अमेरिकेमधील फाइव्हज् डियाग कंपनीमध्ये कंट्रोल इंजिनिअर म्हणून प्लेसमेंट मिळाले, त्याला 75 लाखांच्या पगाराचे पॅकेज मिळाले. (Pune)
यामुळे जे. एस. पी. एम. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक सचिव प्रा (डॉ) तानाजी सावंत,विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ आर एस जोशी,कुलगुरू प्रा बी.बी अहुजा,कुलसचिव विशाल चौधरी,करियर डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स सेलचे सहयोगी संचालक डॉ जितेंद्र खुबानी यांनी अजितचे अभिनंदन केले.
डॉ तानाजी सावंत म्हणाले, कि “जे. एस. पी. एम. विद्यापीठात आम्ही ज्या शिक्षणासाठी प्रयत्न करतो त्याचे उत्कृष्टतेचे उदाहरण म्हणजे अजितचे यश आहे. विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि ए. आय. मध्ये मजबूत पाया विकसित करण्यात जे. एस. पी. एम. विद्यापीठाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. (Pune)
जे. एस. पी. एम. विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. आर. एस. जोशी म्हणाले की, अजितचे यश विद्यापीठाने दिलेले उच्च दर्जाचे शिक्षण आणि उद्योगासाठी सज्ज असे प्रशिक्षण अधोरेखित करते. संशोधन, व्यावहारिक शिक्षण आणि आघाडीच्या जागतिक कंपन्यांसोबतच्या सहकार्य करार संस्थेने लक्ष केंद्रित केल्याने हे शक्य झाले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. बी.बी आहुजा म्हणाले कि, “अजित ची नियुक्ती ही आमच्या विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे”. अजित सारखे इतर मेहनती आणि त्यांनी केलेली यशस्वी कामगिरीबद्दल आम्हाला गर्व आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विशाल चौधरी म्हणाले की, अजितचा अमेरिकेपर्यंतचा प्रवास रोबोटिक्स, एआय आणि ऑटोमेशन क्षेत्रातील भावि अभियंत्यांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे. (Pune)
विद्यापीठातील करियर डेव्हलपमेंट अँड कॉर्पोरेट रिलेशन्स सेलचे सहयोगी संचालक डॉ जितेंद्र खुबानी म्हणाले की, अजितची फाइव्ह्स डीयाज कॉर्पोरेशनमध्ये नियुक्ती ही केवळ त्यांच्या क्षमतेचा पुरावा नाही तर जेएसपीएम विद्यापीठासाठी अभिमानाचा क्षण आहे.जे उद्याच्या सक्षम विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी संस्थेची वचनबद्धता दर्शवते.
---Advertisement---
---Advertisement---
Pune : जेएसपीएमचा भदोरीयला अमेरिकेच्या कंपनीत ७५ लाखाचे पॅकेज
---Advertisement---
- Advertisement -