Pune: पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ही आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण आग लागली तेव्हा प्रवासी उपस्थित नव्हते. मात्र, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या मेट्रो स्थानकाला आग लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
प्राथमिक माहितीप्रमाणे, वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळवले. मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.
या घटनेनंतर, मेट्रो स्थानकाच्या सुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली जात आहे, कारण 26 सप्टेंबर रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रो स्थानकाचे उद्घाटन केले होते. मेट्रोचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना उद्घाटन करण्यात आले होते, आणि आग लागल्याने आता प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याची दुर्दैवी घटना काही वेळापूर्वी घडली होती. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर हा प्रकार घडला असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.”
यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.”, असं ट्वीट मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.
Pune
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान
सलमान खानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती