Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे : शिक्षण घेणे हा आनंद सोहळा – दत्तात्रेय वारे

भोसरी : आदर्श शिक्षक, राष्ट्रपती पारितोषिक विजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वाबळेवाडी शाळेचे शिल्पकार, शिक्षण राज्यमंत्र्यांचे स्वीय दत्तात्रेय वारे यांचे भोसरी येथील नारायण शिक्षण संस्थेच्या शाळेत व्याख्यान संपन्न झाले, या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

---Advertisement---

दत्तात्रय वारे सरांचे स्वागत बुके, शाल, श्रीफळ देऊन नारायण हट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीप बेंडुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार दिगंबर ढोकले हे होते.

दत्तात्रेय वारे म्हणाले, “नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळास जागतिक दर्जाची करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी स्वतः करेन ! “शिक्षण घेणे हा आनंद सोहळा वाटला पाहिजे, शाळेत येताना मुलांनी घाई केली पाहिजे व घरी जाताना ती रेगंली पाहिजे, मुलांना शिकवणी लावण्याची गरज पडायला नको, अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांचे संस्कार व्हावेत.व सर्वांगीण विकासाकडे शाळांनी लक्ष द्यावे, शाळांच्या इमारतीत उद्याचा आदर्श नागरिक निर्माण व्हावा, समाजही आपल्याबद्दल उत्तरदायित्व असल्यामुळे चांगल्या शाळा गावागावात निर्माण व्हावयास हव्यात.

---Advertisement---

यापूर्वी वाबळेवाडी तालुका शिरूर येथे शाळेत केलेले काम व जागतिक कीर्ती पर्यंत शाळेचे पोचवलेला दर्जा, व सध्या कनेरसर ता. खेड जि. पुणे येथे कार्यरत असताना चालू असलेले काम, नाविन्यपूर्ण उपक्रम विषयी सखोल माहिती व्याख्यानातून त्यांनी दिली. 

नारायणहट शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “आदरणीय दत्तात्रेयवारे सरांच्या मार्गदर्शनाखाली नारायण हट शिक्षण संस्था आपली शाळा एक आदर्श व नामवंत शाळा बनवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी व समाज विकासाचे केंद्र करण्यात येईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष दिगंबर ढोकले आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले, नारायण हटशिक्षण संस्थेची शाळा भोसरी परिसरात एक नामवंत शाळा म्हणून नक्की उदयास येईल असा आशावाद व्यक्त केला. व शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी नारायण शिक्षण संस्थेचे संचालक, गृह संस्थेचे सभासद, परिसरातील नागरिक, पालक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अंकुशराव गोरडे, संदीप बेंडुरे, रोहिदास गैंद, मुकुंद आवटे, डॉ. वसंतराव गावडे, शिवराम काळे, उज्वला थिटे, रोहिणी पवार यांनी केले. सूत्रसंचालन मीनल बागुल यांनी केले. आभार सायली संत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय चौगुले, प्रतिभा तांबे, प्रवीण भाकड, सुरेखाताई मुके, भाग्यश्री नगरकर, विशेष प्रयत्न केले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles