Friday, November 22, 2024
Homeग्रामीणपुणे : आंबेगावच्या आदिवासी भागातील डॉ. शेखर बेंद्रे आरोग्य केंद्रास हिमोग्लोबिन तपासणी...

पुणे : आंबेगावच्या आदिवासी भागातील डॉ. शेखर बेंद्रे आरोग्य केंद्रास हिमोग्लोबिन तपासणी मशीन भेट

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील महाळुंगे-पाटण येथील आरोग्य केंद्रासाठी हिमोग्लोबिन तपासणी मशीन भेट देण्यात आले. येथे मागील दोन वर्षापासून जन आरोग्य मंच यांच्याद्वारे डॉ. शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र चालू आहे. येथे दर रविवारी मोफत आरोग्य सेवा देण्यात येतात. या केंद्रासाठी हिमोग्लोबिन तपासणी मशीन मिळावे, अशी मागणी आरोग्य केंद्राचे डॉक्टर, स्थानिक कार्यकर्ते अशोक पेकारी व राजू घोडे यांनी जीएसटी उपायुक्त महेश जगताप यांच्याकडे केली होती.

त्यानुसार डॉ. नेहा देशमुख, डॉ. नीलिमा नगरकर, डॉ. प्रांजली खडसे व प्रज्ञा पांडे यांनी उपायुक्त जगताप यांच्या मदतीने एक मशीन खरेदी करून आरोग्य केंद्राचे डॉ. ज्ञानेश्वर मोठे, डॉ. लता शेफ  यांच्याकडे सुपूर्द केली.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागासाठी हे यंत्र खूप उपयुक्त ठरणार असून ते महाळुंगे-पाटण येथील आदिवासींनी श्रमदानातून उभारलेल्या रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. अमोल वाघमारे यांनी सांगितले. हे मशीन उपलब्ध करून देण्यासाठी रवींद्र वायाळ व माजी नायब तहसिलदार विजय केंगले यांनी प्रयत्न केले.

डॉ. शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र आदिवासींंसाठी उपयुक्त

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते डॉ. शेखर बेंद्रे यांच्या अपघाती निधन झाले. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाळुंगे-पाटण या आदिवासी भागात डीवायएफआय च्या कार्यकर्ते, जन आरोग्य मंच, अखिल भारतीय किसान सभा, टीम तरुणाई , स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रयत्नाने हे केंद्र उभे राहिले. 

दर रविवारी जन आरोग्य मंच, पुणे च्या माध्यमातून येथे मोफत आरोग्य सेवा दिली जाते. दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरत आहे. दवाखाने ही पैसा कमविण्याची केंद्र बनली असताना ‘डॉ. शेखर बेंद्रे आरोग्य केंद्र’ “माणूसकीची साद” घालत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय