Pune: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे प्रशासन सतर्क आहे, अशातच पुण्यात मोठी घटना घडली आहे. पुण्यातील भोरजवळील खेड-शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी बड्या नेत्याशी संबंधित कारमधून तब्बल 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेने पुणे आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान इनोव्हा क्रिस्टा या कारमध्ये तब्बल 5 कोटी रुपयांची रक्कम सापडली. कार सांगोल्यातील नलवडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये 5 कोटी रुपयांची रोकड होती. या प्रकरणी तात्काळ इन्कम टॅक्स विभाग व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक ट्वीट केले आहे. यांनी या प्रकरणावर थेट टिप्पणी केली आहे. त्यांनी ट्वीट करत शिंदे गटातील एका आमदाराच्या गाडीत 15 कोटी रुपयांची रोकड सापडल्याचा दावा केला आहे. “हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर… मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 75 कोटी पाठवले आहेत, यातील 15 कोटींचा हा पहिला हप्ता आहे,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे, तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Pune
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
पुण्यातील महात्मा फुले मंडई परिसरातील मेट्रो स्थानकाला भीषण आग
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान
सलमान खानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी
देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल
पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती