Friday, November 22, 2024
HomeNewsजंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन,ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या

जंतरमंतर येथे कुस्तीपटू खेळाडूंचे आंदोलन,ब्रिजभूषण सिंग हटाव च्या मागण्या

ब्रिजभूषण सिंग हॉटेलच्या रुममध्ये नेमकं काय करायचे… प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये रडत-रडत विनेश फोगाटने सांगितली आपबिती

दिल्ली
: भारतीय कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. त्यात ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक तसेच विनेश फोगट यांच्या नावाचा समावेश आहे.हे सर्व भारतीय कुस्ती महासंघाचा निषेध करत आहेत. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग हे मनमानीपणे वागत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. याबाबत खेळाडू सतत ट्विट करत असतात. यासोबतच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना बजरंग पुनिया म्हणाले की, ब्रिजभूषण सिंग हे शिवीगाळ करतात, तसेच मारहाण करतात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या बजरंगने सांगितले की, प्रायोजकांचे पैसे महासंघ खातो. त्यातून खेळाडूंना काहीच मिळत नाही.

त्याचवेळी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी मलिक सांगते की, फेडरेशन या स्पर्धेत स्वत:च्या पैशावर खेळण्यास सांगतो. जो खेळाडू ते स्वीकारत नाही त्याच्यावर बंदी घातली जाते.एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेश फोगटने आणखी मोठा आरोप केला आहे. ती म्हणाली की मी घाबरून इथपर्यंत पोहोचली आहे. विनेश फोगट यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर मोठा आरोप केला असून त्यांचे लोक फोनवर जीवे मारण्याची धमकी देतात, असे म्हटले आहे.

विनेश म्हणाली की, ” जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो, तेव्हा ब्रिजभूषण हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे. ही नियमांच्या विरोधात आहे. ब्रिजभूषण फक्त एवढेच करायचे नाहीत तर ते महिला खेळाडूंच्या मजल्यावरच आपली रुम बूक करायचे. त्यानंतर जाणून बुजून ते आपल्या रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे. जेव्हा माझा टोकिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव झाला तेव्हा त्यांनी मला तुझं नाणं खोटं आहे, असं सांगितलं होतं. त्याचबरोबर माझा मानसीक छळही केला. त्यामुळे माझ्या मनात प्रत्येक दिवशी आत्महत्या करण्याचा विचार येत होता.

खुद्द अध्यक्षांनी किती मुलींचे लैंगिक शोषण केले हे मला माहीत नाही. येथे बसलेल्या एक-दोन मुलींसोबत असा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. आज मी बोलते, उद्या मी जिवंत राहिल की नाही माहीत नाही. बजरंग, साक्षी आणि विनेश यांच्या व्यतिरिक्त, जागतिक विजेतेपद पदक विजेत्या सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा आणि राष्ट्रकुल पदक विजेता सुमित मलिक यांच्यासह 30 कुस्तीपटू स्ट्राइकमध्ये सहभागी आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय