Friday, April 26, 2024
HomeNewsपीकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

पीकविमा भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

हिंगोली : पीकविमा भरपाईसाठी (Crop Insurance Compensation) गोरेगाव (ता. सेनगाव) येथे सुरू असलेल्या शेतकरी उपोषणाला (Farmers Protest) पाठिंबा म्हणून गुरुवारी (ता.१९) भगवती येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.गेल्या तीन वर्षांपासून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मात्र पीकविमा कंपन्या संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा देण्यास तयार नाहीत. २०२०-२१ चे एचडीएफसी ॲग्रो कंपनीचे १३.८९ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनींना आदेश देऊन पंधरा दिवसांत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली जाईल. रक्कम वळती झाली नाही तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे लेखी आश्‍वासन दिले होते.

परंतु अद्यापपर्यंतही ना रक्कम मिळाली ना गुन्हे दाखल झाले. त्यामुळे बुधवार (ता. १८)पासून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर नामदेव पतंगे, गजानन कावरखे, रावसाहेब अडकिने, ऋषिकेश बर्वे, बापूराव गरड यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय