अंबाजोगाई : दौनापुर ता.परळी येथील मनिषा आघाव – केंद्रे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान केली आहे.
त्यांनी अर्थशास्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.वाय.बी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली “मराठवाडा विभागातील पाणलोट विकास कार्यक्रमाचे कृषी क्षेत्रातील योगदान” या विषयावर विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. या शोध प्रबंधावर त्यांना विद्यापीठानी पीएच.डी पदवी प्रदान केली आहे. त्याकरिता त्यांचे प्रा.डॉ. वाय.बी.चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई चे प्राचार्य डॉ.पी. आर. थारकर, प्रा.डॉ.शैलजा बरुरे, प्रा.डॉ.निलेश होदलुरकर, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण दळवे, प्रा. कृष्णा आघाव यांनी अभिनंदन केले.