पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण पेठ क्र.१६ येथे स्वरसुमन आणि माजी महापौर विद्यमान नगरसेवक राहुल जाधव आणि दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका मंगल जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती गीते, अभिजात गायन, भावगीते, अभंगवाणी, लावणीचा सुमधुर कार्यक्रम राजेशिवाजीनगर, पेठ क्र.१६ येथील संत सावतामाळी उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नगरसेवक राहूल जाधव यांनी सांगितले की, करोनाचा तणावपूर्ण कालखंड संपला आहे, अभिजात संगीताचा अप्रतिम सुरेल कार्यक्रमाद्वारे या दिवाळीच्या मुहूर्तावर अशा प्रकारचा प्रथमच सांकृतिक कार्यक्रम चिखली प्राधिकरणातील या निवासी क्षेत्रात आयोजित केला आहे. स्वरसुमन संस्थेच्या निवृत्ती धाबेकर, दिगंबर राणे, दिपाली ढमाल, केतन दळवी, रोशन सुतार, अनुपकुमार, मधुर ठाकूर, सुधाशु धाबेकर यांनी दिवाळी पहाटचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप भांबे यांनी केले. संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सोलट यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शरद रोकडे, बाळासाहेब बाबरे, मल्लिकार्जुन कुंभार, महेश पोळ, महेश जगताप, बंडू पवार, पोपट जाधव, राजेश शेळके, सुनील शितोळे, दत्तात्रय बढे यांनी केले.