Narendra modi : आताची एक महत्वाची बातमी येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. आता सर्व एनडीए पक्ष आजच्या बैठकीनंतर राष्ट्रपतींसमोर सरकार स्थापनेचा दावा करू शकतात.
नरेंद्र मोदींनी (Narendra modi) आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला (PM Modi Resigns). त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेसह त्यांचा राजीनामा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाला नवीन सरकार येईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली आहे. नवीन सरकार स्थापने अगोदर औपचारीकरित्या हा राजीनामा द्यावा लागतो.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नरेंद्र मोदी (Narendra modi) हे 8 जूनच्या संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. एनडीएने 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला.
Narendra modi हे दुसरे नेते असतील
दरम्यान, एनडीएने सरकार स्थापन केल्यास माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनंतर तिसऱ्यांदा सत्तेवर राहणारे मोदी हे दुसरे नेते असतील. मात्र दुसरीकडे इंडिया आघाडी देखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचे बघायला मिळत आहे.


हेही वाचा :
मोठी बातमी : NEET परिक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल !
रायगड लोकसभेत सुनील तटकरे विजयी, अजित पवार गटाला केवळ एक जागा
नांदेड लोकसभेतून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी, भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव
कोल्हापूर लोकसभेतून शाहू महाराजांचा मोठा विजय, तर हातकणंगले मधून धैर्यशील माने विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ (पराग) वाजे विजयी, हेमंत गोडसे यांचा पराभव
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव यांचा ३ हजार ८३१ मतांनी विजयी
ब्रेकिंग : राज्यातील सर्व विजयी 48 खासदार उमेदवारांची यादी, पाहा !
दिल्लीत मनोज तिवारी यांच्याकडून कन्हैया कुमार यांचा पराभव
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव