Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चऱ्होली येथे पॅराडाइस इंटरनॅशनल स्कूल मध्ये पर्यावरण दिन साजरा

PCMC : चऱ्होली येथे पॅराडाइस इंटरनॅशनल स्कूल मध्ये पर्यावरण दिन साजरा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल, काळे कॉलनी, चऱ्होली मध्ये जागतिक पर्यावरण दिन (World environment day) उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिकांनी सादर केलेल्या पर्यावरणावर आधारित नाट्यातून करण्यात आली . शिक्षकांनी या नाट्यातून पर्यावरणाचा वाढता -हास व तो थांबवण्याचा उपाय हे पटनाटय सादर केले. विद्यार्थ्यांकडून एक वृक्ष जगविण्याची प्रतिज्ञा घेतली. pcmc

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे,संचालक नवनाथ काळे, संचालक तथा नगरसेवक ॲड. सचिन काळे  उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सचिन काळे  यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले. pcmc

ॲड.सचिन अनंत काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वृक्षाचे महत्व व वाढते प्रदूषण रोखण्याचे उपाय याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुंदा  काळे यांनी काही बहुगुणी व औषधी वनस्पती वृक्षांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.

स्वाती काळे मुख्याध्यापिका किड्स पॅराडाईज स्कूल यांनी देखील वृक्षारोपण करण्यात सहभाग घेतला होता. (tree plantation) कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षाचे संवर्धन करण्याचे व वृक्ष जगवण्याची विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

लोकप्रिय