पंजाब – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी उणीव राहिली. ते पंजाब येथे हेलिकॉप्टरने येणार होते खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी रस्त्याने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जात असताना आंदोलकांनी सुमारे ३० किमी अंतरावरील उड्डाणपुलावर त्यांचा मार्ग अडवला. 15-20 मिनिटांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पंतप्रधानांचा ताफा भटिंगा विमानतळावर परतला.
भटिंडा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले की, भटिंडा विमानतळावर परतल्यावर पंतप्रधान मोदींनी तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले , “तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार की मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत परत येऊ शकलो.”
पंजाबमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते जेव्हा काही आंदोलकांनी रस्त्याने जात असताना रस्ता अडवला. केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी असल्याचे म्हटले आहे. गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याने पंजाबच्या भेटीदरम्यान गंभीर सुरक्षा उल्लंघनानंतर नाईलाजाने परतण्याचा निर्णय घेतला.
पंजाब सरकारला पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाच्या योजनांची आगाऊ माहिती देण्यात आली होती. प्रक्रियेनुसार त्यांना रसद, सुरक्षा तसेच आकस्मिक योजना तयार ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी लागली. तसेच आकस्मिक योजना लक्षात घेता, पंजाब सरकारला रस्त्याने कोणतीही हालचाल सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागणार होती, मात्र त्यात स्पष्टपणे उणीव दिसून आली.