Wednesday, February 5, 2025

अटकपूर्व जामीन फेटाळला, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी  संगमेश्वर येथील गोळवलीमध्ये  ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. संगमेश्वर येथील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राणेंचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला होता. नारायण राणेंना दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. कोणते कलम लावण्यात आले याची माहिती देण्यात आली. 

नाशिक पोलिसांनी नोंदवला होता गुन्हा. दिवसभरापासून नारायण राणेंच्या अटकेबाबत चर्चा सुरू होती. ज्यानंतर हाय व्होलटेज ड्रामा झाला आणि अखेर राणे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, राणे समर्थकांकडून अद्यापही अटकेच्या वृता दुजोरा दिला जात नसून, त्यांना ताब्यात घेतल्याचंच ते म्हणत असल्याचं दिसत आहे. 

हे पण पहानारायण राणे यांचे विरोधात भोसरीत शिवसेनेचे आंदोलन

संगमेश्वरमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त, पोलिसांची दुसरी तुकडी गोळवलीमध्ये दाखल झाली आहे. कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना कोकणात ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्र्यास राज्य सरकारकडून अटक होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ आहे, असे जाणकार म्हणतात. दरम्यान नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे.

नारायण राणेंविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार, त्यामुळे नारायण राणेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. संगमेश्वर पोलिसांकडे नारायण राणेंना अटक करण्यासंदर्भात कोणतेही वॉरंट नाही, आमच्यावर खूप दबाव असल्याची पोलिसांची माहिती आहे.

हे पण वाचा ! पिंपरी चिंचवड : दिव्यांगांचे पोलिसांसोबत रक्षाबंधन !

नारायण राणे यांच्यावरील संभाव्य कारवाईबद्दल नाशिक चे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. ‘शिवसेनेचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्ह्याचा प्रकार आणि गांभीर्य बघता नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करून न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं,’ असं पांडे यांनी स्पष्ट केलं.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles