भोसरी : नक्षत्राचे देणं काव्यमंच ( महाराष्ट्र राज्य ) यांच्या सयुक्त विद्यमानाने मोशी, चिखली, पिंपरी, लांडेवाडी, दिघी भागातील एस.एस.सी. परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थाना व शालेय आदर्श मुख्याध्यापकानां प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सायकलपटू दत्ता घुले यांची उपस्थिती होती. विद्यार्थानां खेळाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच मैदानी खेळालाही महत्व दिले पाहिजे. खेळाकडे आवड व छंद म्हणून पाहिले पाहिजे. शालेय परीक्षा गुणांपेक्षा, खेळातले कला कौशल्य आनंदी व प्रेरणादायी असतात. दररोज व्यायाम केल्याने शरीर निरोगी, व्यस्त व मन प्रसंन्न राहते.’
यावेळी संस्थेचे संस्थापक प्रा.राजेंद्र सोनवणे, कृष्णकुमार गोयल, डाॅॅ.अभय कुलये, डाॅ.शांताराम कारंडे आदीसह गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
हे पण पहा ! नारायण राणे यांचे विरोधात भोसरीत शिवसेनेचे आंदोलन
हे पण वाचा ! पिंपरी चिंचवड : दिव्यांगांचे पोलिसांसोबत रक्षाबंधन !
मोठी बातमी : अटकपूर्व जामीन फेटाळला, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक