Wednesday, February 5, 2025

पिंपरी चिंचवड : कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवा महिला भगिनींसोबत ‘रक्षाबंधन’ सण साजरा

पिंपरी चिंचवड : सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवा महिला भगिनींसोबत ‘रक्षाबंधन’ सण साजरा केला. तसेच प्रभाग १७ मध्ये राखी निमित्त विधवा भगिनींना आर्थिक मदत केली.

कोरोना महामारीत पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. या मृत्यूमुळे शहरातील अनेक महिला विधवा झाल्या आहेत. कोरोनामुळे झालेला दवाखाना खर्च, कर्ज, मुलांची जबाबदारी व संसाराचे ओझे यामुळे या एकल महिलांची स्थिती अतिशय विदारक झाली आहे. अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पुढाकार घेतला आहे. 

राखी सांत्वनाची! राखी जबाबदारीची राखी कृतज्ञेची या भावनेतून राखी निमित्त प्रभाग क्रमांक १७ मधील अशा ४२ महिला भगिनींकडून राखी बांधून घेत “रक्षाबंधन” सण साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना मिठाई, साडी चोडी आणि २१०० रुपयांची रोख स्वरूपात भेट देण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी, चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप, धर्मजागरणचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हेमंत हरहरे, नगरसेवक सचिन चिंचवडे, भाजपा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, भाजपा शहर चिटणीस संजय भंडारी, स्वीकृत नगरसदस्य बिभीषण चौधरी, भाजपा कामगार आघाडी उपाध्यक्ष शंकर पाटील, चिंचवड- किवळे मंडलाचे सरचिटणीस प्रदीप पटेल, कैलास रोटे, तेजस खेडेकर, प्रभाग अध्यक्ष भगवान निकम, भूषण पाटील, प्रदीप नेहते, अशोक बोडखे, मुरलीधर चोपडे, धीरज धाकड, सचिन महाले, कुणाल इंगळे, योगेश महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना नामदेव ढाके म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिला भगिनींसाठी आर्थिक मदत म्हणून महापालिकेकडून कोविड दिलासा म्हणून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशा आर्थिक मदती बरोबरच या महिला स्वयंनिर्भर व्हाव्यात, यासाठी त्यांना विविध उद्योगांचे प्रशिक्षण देणे, त्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्जपुरवठा यासाठीही योजना आहे. त्यातून विधवा भगिनी खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे. महिलांसाठी महापालिकेच्या विविध योजना आहेत. त्याचबरोबर, कोरोना प्रादुर्भावामुळे हलाखीची परिस्थिती असलेल्या एकल महिला व त्यांच्या लहान मुलांचा शिक्षणाचा खर्च दायित्व म्हणून स्वीकारणार असल्याचे ढाके यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या २५००० रुपये कोविड दिलासा योजनेचे फॉर्मचे वाटप करण्यात आहे. प्रसंगी, महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण चौधरी यांनी केले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles