हरियाणा : १९ ऑगस्टला अखिल भारतीय किसान सभेची हरियाणा राज्य कौन्सिल बैठक रोहतक येथे झाली. संयुक्त किसान मोर्चातर्फे ५ सप्टेंबरला पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये मुझफ्फरनगर येथे होणाऱ्या विराट रॅलीत हरियाणातून हजारो शेतकऱ्यांना येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी धोरणाच्या विरोधात भाजप ला सत्तेतून खाली आणण्यासाठी ‘मिशन उत्तर प्रदेश – उत्तराखंड’ चे उदघाटन ५ सप्टेंबरला होणार असल्याचेही ढवळे म्हणाले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरियाणा राज्य अध्यक्ष फूल सिंग शेवकंद हे होते, तर किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पी. कृष्णाप्रसाद, राज्य उपाध्यक्ष इंदरजित सिंग आणि राज्य सचिव सुमित यांनी संबोधित केले.