Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार ? राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यात मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

---Advertisement---

या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर हिंदी भाषिकांविरोधात हिंसा भडकावल्याचा आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही बातमी सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका | Raj Thackeray

सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या या याचिकेत राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. याचिकेनुसार, 30 मार्च 2025 रोजी गुडी पाडवा रॅलीदरम्यान राज ठाकरे यांनी मराठी भाषा आधिकारिक कामांसाठी अनिवार्य करण्याची मागणी केली होती. बँक, दुकानं आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही ते तपासायचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये जावून मराठी भाषेचा आग्रह धरला. (हेही वाचा – मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी 20 कोटींची सुपारी)

---Advertisement---

याचिकाकर्त्यांनी या वक्तव्याला हिंदी भाषिकांविरोधातील हिंसाचाराला चिथावणी देणारं म्हटलं आहे. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, राज ठाकरे आणि मनसेच्या या कृतीमुळे महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ले होण्याची शक्यता वाढली आहे, ज्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो. (हेही वाचा – धक्कादायक : टार्गेट पूर्ण न केल्याने कामगारांना कुत्रा बनवले, प्रायव्हेट पार्टला स्पर्श व्हिडिओ व्हायरल)

या याचिकेत निवडणूक आयोगाला मनसेची मान्यता रद्द करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, मनसेने आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून हिंदी भाषिक समुदायाला लक्ष्य केले आहे, जे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. (हेही वाचा – घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांना झटका)

राज ठाकरे यांची मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सातत्याने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत मनसेने उत्तर भारतीयांविरोधात आंदोलने केली आहेत, ज्यामुळे राज्यात अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. (हेही वाचा – महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, वाचा काय आहे प्रकरण !)

सर्वोच्च न्यायालय काय करणार? | Supreme Court

सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालय या प्रकरणाची दखल घेते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (हेही वाचा – नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा, पुरुष आयोगाची केली मागणी)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles