Thursday, February 13, 2025

लोकनेते शरद पवार यांचा वाढदिवस-राष्ट्रवादी अर्बन सेल महिला विभागाच्या वतीने अध्यक्षा मनिषा गटकळ आणि सहकारी यांचे कडून एक अगळावेगळा सन्मान सोहळा संपन्न

शास्त्रीय संगीत बाल कलाकार ‘वंडर बॉय’ पृथ्वीला सन्मान पत्र देऊन गौरविले

पिंपरी-चिंचवड़/क्रांतिकुमार कडुलकर
: महानगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजीनियर सतीशजी इंगळे आणि सुविद्य पत्नी यांचा 14 वर्षीय मुलगा पृथ्वीचा संगीत गायन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल शहराध्यक्ष अजित गव्हाणे व अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ आणि सहकारी, इतर सर्व मान्यवर यांचे हस्ते पृथ्वीला फेटा बांधून औक्षण तसेच शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन शेकडो भाविकांमध्ये सन्मानित करण्यात आले.शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या अध्यक्षतेत तसेच माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये स्वामी समर्थ मंदीर, शिवतेजनगर, चिंचवड येथे संपन्न झाला.

गायन क्षेत्रात १४ वर्ष शास्त्रीय संगीत शिकत अतिशय उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या पृथ्वी(वंडरबॉय) ला सन्मान पत्र देत सन्मानित करण्यात आल. संगीत आणि भक्तिगीत गावून पृथ्वी ने सर्वांची मने जिंकत सर्वांच्याच डोळ्यातुन आनंदाश्रु काढले. या दैदिप्यमान सोहळयात पृथ्वी व त्यांच्या कुठूंबियाच्या हस्ते स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर माननीय पृथ्वीचे कौतुक करताना शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांनी राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टी पृथ्वी च्या यशाची दखल घेत त्याला व्यासपीठ तैयार करुन देऊल अशी ग्वाही देत त्याच्या सोबत सदैव पाठीशी राहु असा शब्द देत शुभेच्छा दिल्या.

या सन्मान सोहळ्यास शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे,माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, अर्बन महिला अध्यक्ष मनिषा गटकळ,युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप,पदवीधर अध्यक्ष माधव पाटील, वाहतूक सेल अध्यक्ष काशीनाथ जगताप, भोसरी उपाध्यक्ष सुनील कदम, शहर सरचिटणीस राजाराम सावंत, शहर सरचिटणीस अशोक मगर, हरिनारायण शेळके, महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा-कविता खराडे, ओबीसी सेल महिला अध्यक्ष सारिका पवार, अर्बन निरीक्षक मीराताईं कुदळे, अर्बन शहर समन्वयक-मनिषा जडर, अर्बन शहर समन्वयक बबिता बनसोड, अर्बन शहर समन्वयक संगिता गोडसे, राजू गुणवंत तसेच इतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाची प्रस्ताविक मनिषा गटकळ यांनी केल तर सूत्र संचालन राजाराम सावंत यांनी केले ,काशीनाथ जगताप व सतीश इंगळे यांनी पृथ्वी आतापर्यंत च्या संगीत क्षेत्रातील प्रवास याची माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार मनिषा जडर यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles