Home News PCMC:चिखली प्राधिकरण पेठ क्र.१६ येथे भव्य शिवजयंती महोत्सव

PCMC:चिखली प्राधिकरण पेठ क्र.१६ येथे भव्य शिवजयंती महोत्सव

अधिपती प्रतिष्ठान आयोजित विविध सांस्कृतिक उपक्रम


पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:अधिपती प्रतिष्ठान,पेठ क्रमांक.१६, चिखली प्राधिकरण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती चे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कु.पुर्वा हडवळे हिने शिवरायांचे विचार आणि आपण या विषयावर व्याख्यान दिले.

तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेल्या ४० लहान मुला मुलींना प्रतिष्ठान तर्फे भेट वस्तु देण्यात आल्या.सोबतच शिवमूद्रा ढोल ताशा पथक आणि शिवयोद्धा मर्दानी आखाडा यांचे प्रात्यक्षिक झाले.अधिपती प्रतिष्ठान मार्फत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या गड संवर्धन करणार्या संस्थेला रोख रक्कम देऊन त्यांच्या कार्याला मदत करण्यात आली.

संस्थापक /अध्यक्ष संदीप मनोहर शिंदे मार्गदर्शक तुषार सहाणे यांच्या नेतृत्वाखाली व सर्व अधिपती प्रतिष्ठान चे मान्यवर सदस्य सौरभ देवकुळे, साईदीप बोरकर,वैभव देसाई,अक्षय पाटील,अनिकेत चौधरी,रोशन वारंग,रोहित शिंदे, निलेश वणवे,शशांक गायकवाड,दुर्गेश पोळ,महेश सोनकांबळे,विनय भाईक,धर्मेश परदेशी, अभिषेक सोलट,आदित्य वाळुंज, निखिल देवकाते, अभिजीत चोपडे, या सर्वांच्या व सर्व मान्यवरांच्या साथीने हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत शिवजयंती का साजरी करावी व छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेलं कार्य व त्यांचे विचार लोकांपर्यंत कसे पोचले पाहिजे याचा प्रयत्न अधिपती प्रतिष्ठान ने केले आहे.तसेच यापुढे सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून संदेश सगळ्यांपर्यंत पोचतील याची हमी दिली आहे.

Exit mobile version