पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेच्या विद्युत खांबांवर टाकून डीटीएच इंटरनेटच्या केबल अनधिकृतपणे टाकण्यात आल्याने सर्वच रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे. महात्मा फुलेनगर, चिखली परिसरात सध्या सर्वत्र अनधिकृत केबलचा गुंता वाढला आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे विद्युत खांबांवरून, इमारतीवरून, झाडांवरून जेथे जागा मिळेल तेथे अशा केबलचे जाळे पसरले आहे. केबलवर नाव नसल्यामुळे त्या मालकाचे नाव समजत नाही, त्यामुळे नोटीस देता येत नाही.
---Advertisement---
अनधिकृतपणे टाकलेल्या केबलमुळे परिसराचा बकालपणा वाढला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. महानगरपालिकेतर्फे या केबलचे सर्वेक्षण करून कारवाई करण्यात यावे, असे नागरिकाकडून मागणी होत आहे.