Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : अनुरूप जोडीदार मिळावा, यासाठी पोटजात सोडा, लिंगायत जोडा, हाच वधुवर मेळाव्याचा उद्देश आहे – बसवराज कनजे

सत्यशोधक समतावादी समाज निर्मितीसाठी महात्मा बसवेश्वर यांनी संघर्ष केला – कामगार नेते काशिनाथ नखाते (PCMC)

आकुर्डी येथे सकल लिंगायत वधुवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे रविवारी दि. ६ रोजी जागतिक लिंगायत महासभा पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. (PCMC)

विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र सह कर्नाटक मधील वधुवर आणि पालक या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यास कामगार नेते काशिनाथ नखाते, उद्योजक पंकज नवबदे, प्रदीप बाबू, पत्रकार क्रांतीकुमार कडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचे सूतोवाच करण्यात आले.

या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना आयोजक श्री. बसवराज कनजे म्हणाले की, एकूण १०० पोटजाती मध्ये लिंगायत समाज विखुरलेला आहे. ८०० वर्षांपूर्वी बसवेश्र्वरांनी जातीभेद, स्त्री पुरुष असमानता, अंधश्रद्धा याविरोधात सामाजिक समतेची चळवळ उभी केली.
आज लिंगायत समाजात पोटजाती आहेत, काळ बदलत आहे, अशा वेळी पोटजातीमध्ये विवाह झाले पाहिजेत. अनुरूप वर वधू मिळण्यासाठी पोटजात सोडा आणि लिंगायत जोडा या भावनेतून आज इथे सर्व जातीतील वधू वरांचा परिचय मेळावा आयोजित करत आहोत. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील वधुवर आणि त्यांचे पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. (PCMC)

---Advertisement---


लग्न हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे, आणि पोट जाती अंतर्गत जातीचा दुराभिमान न ठेवता आर्थिक, सामाजिक स्तरावर गोरगरीब श्रीमंत, नव श्रीमंत, परदेशस्थ अनुरूप वधुवर एकमेकांचा परिचय करून घेतील तसेच पोटजातीचा विचार न करता बसवेश्र्वरांच्या समतावादी विचाराने या मेळाव्यात वधुवर यांनी एकमेकांची पसंती करावी, असे आवाहन बसवराज कनजे यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात केले.


सत्यशोधक समाज निर्मितीसाठी पोटजाती सोडा – काशिनाथ नखाते

या मेळाव्याचे उद्घाटन करताना कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, प्रत्येक धर्मामध्ये पूर्वीच्या काळी गावगाडा चालवण्यासाठी कामाच्या स्वरूपा नुसार पोटजाती तयार झाल्या होत्या. या पोटजातीमुळे समाजात सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढून जातीचा दुराभिमान आणि माझीच जात श्रेष्ठ असे नकारात्मक वातावरण तयार झाले. समाज दुभंगून गेला.

---Advertisement---

ही परिस्थिती बदलण्यासाठी ब्राम्हण कुटुंबात जन्म घेतलेले लिंगायत समाजाचे समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांनी जातीभेद सोडा, माणूस जोडा यासाठी कर्नाटक राज्यात प्रबोधन सुरू केले. बसवण्णा यांचे प्रबोधनपर साहित्य समतेचा संदेश देतात. विविध पोटजातीमध्ये अनुरूप वधू आणि वर आहेत.

जमाना बदलत आहे, आपण आपल्यामध्ये बदल केले पाहिजेत. पोटजाती मध्ये सुशिक्षित आणि आर्थिक संपन्न तसेच शेतकरी व्यापारी यांची मुले मुली आहेत, सर्व पोटजाती एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे जागतिक लिंगायत महासभा आयोजित या वधुवर परिचय मेळाव्यात शुभ मंगल होतील, आणि पोटजात सोडा लिंगायत जोडा हा विचार प्रत्यक्ष अमलात येईल असा मला विश्वास निश्चित आहे. असे काशिनाथ नखाते म्हणाले. (PCMC)

या मेळाव्यास जागतिक लिंगायात महासभेचे प्रदेश कमिटी सदस्य हरकुडे सर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश डिगोळे व सिध्दु नावदगेरे हे मान्यवर उपस्थित होते.


या मेळाव्यात विविध स्तरावरील वधुवर आणि पालक यांनी व्यासपीठावर एकमेकांना परिचय करून देण्याचा कार्यक्रम झाला. एकूण २५० पेक्षा जास्त वधु वरानी मेळाव्यात नोंद केली. पालकांसह सुमारे ६०० लोक उपस्थित होते.

लिंगायत महासभेच्या वतीने यावेळी स्वतंत्र व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी अशा मेळाव्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते.

या मेळाव्याचे सुत्रसंचलन श्री बालाजी पाटील, आभार श्री चंद्रकांत खोचरे यांनी केले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री घोंगडे काका, शिवपुजे सर, नाटके सर व जागतिक लिंगायत महासभा महिला आघाडीच्या सौ. लिला म्हेत्रे, सौ. राजश्री हांचे, सौ. सरस्वती कनजे, सौ. मनिषा खोचरे यांचे सहकार्य लाभले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles