पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस (world environment day) साजरा केला जातो. (PCMC)
त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दिनांक ५ जून ते १२ जून या कालावधीत उद्यान व वृक्षारोपण विभाग आणि देवराई फाऊंडेशनच्या वतीने निगडी येथील दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे ‘भव्य वृक्षारोपण कार्यक्रम तसेच नागरिकांना १० हजार वृक्षरोपट्यांचे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. Tree plantation
या मोहिमेचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्या ५ जून रोजी सकाळी ८.०० वाजता करण्यात येणार असून या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, तसेच उद्यान विभागाचे उपआयुक्त रविकिरण घोडके, देवराई संस्थेचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. pcmc
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
उद्यान विभागाच्या वतीने वृक्षरोपटे मागणी फार्म देखील भरून घेण्यात येणार आहेत, त्यासाठी https://forms.gle/jZWhr7r6SZkhRqMc9 या लिंकवर आपली माहिती भरून पाठवावी, असे आवाहन उद्यान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा :
पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !
ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय
ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव
ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव
मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव
मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव
ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का
ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर
ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर
सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर
मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण