Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न देणाऱ्या क्रिस्टल कंपनीवर कारवाई करा

PCMC : कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न देणाऱ्या क्रिस्टल कंपनीवर कारवाई करा

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांची मागणी (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड आणि ह प्रभागांतर्गत येणाऱ्या उद्यान, महापालिका शाळा व पाण्याची टाकी याठिकाणची सुरक्षा व देखभाल करण्याच्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नमलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत आणि किमान वेतन दरानुसार वेतन न देणाऱ्या क्रिस्टल कंपनीवर कायदेशीर कारवाई कारण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील अनेक कामांचे खासगीकरण केलेले आहे त्यानुसार ड आणि ह प्रभाग हद्दीतील उद्यान, महापालिका शाळा व पाण्याची टाकी येथे सुरक्षा व देखभालीसाठी कर्मचारी नेमण्याचे काम क्रिस्टल या कंपनीला देण्यात आलेले आहे. महापालिकेने किमान वेतन दरानुसार कर्मचारी नेमून त्यांच्याकडून उद्यान, महापालिका शाळा व पाण्याची टाकीची सुरक्षा करण्यास क्रिस्टल या कंपनीला सांगितलेले आहे. मात्र या कंपनीने किमान वेतन दरानुसार कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. (PCMC)

या कर्मचाऱ्यांना किमान वेतन दरानुसार क्रिस्टल कंपनी दर महिन्याला वेळेवर पगार देत नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून क्रिस्टल या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

संबंधित लेख

लोकप्रिय