Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : वाकड येथे स्विमिंग स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : 𝚂.𝙺 𝙳𝙰𝙽𝙲𝙴 𝚂𝚃𝚄𝙳𝙸𝙾 & 𝚂𝙺𝙰𝚃𝙸𝙽𝙶 𝙲𝙻𝚄𝙱 च्या संयुक्त विद्यमाने वाकड येथे क्लबचे व्यवस्थापक आकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्विमिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सिल्व्हर स्कायस्केप या सोसायटी मध्ये राकेश अग्रवाल, आम्रेश विस्वास, जयेश पटवर्धन, सुनील गुरनानी, सुमेधा अग्रवाल,नवनाथ धेंडे या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी देऊन स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. खालील विजेत्याना प्रशस्ती पत्रक, ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले.

---Advertisement---



अवॉर्ड फंक्शन हा तीन टप्यात संपन्न झाला.


1) बेस्ट बिगिनर (गट)

√ आभ्रा विश्वास – प्रथम
√ जया पटवर्धन – द्वितीय
√ अद्वय आणि अद्वित कोठेकर – तृतीय

२) बेस्ट अडवान्स (गट)

√ शरयू पवार – प्रथम
√ अक्ष अग्रवाल – द्वितीय
√ अस्मी करोळीवाल – तृतीय


३) बेस्ट स्वीमिंग चॅम्पियनशिप ट्रॉफी -अक्ष अग्रवाल ( winner )
व इतर सर्व स्पर्धकांना सर्टिफिकेट व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आकाश कावळे यांनी स्विमिंग मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम खेळ असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश मोरे यांनी केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles