Wednesday, February 12, 2025

PCMC : ‘त्यांची’ दिवाळी गोड केली ! सावली निवारा केंद्रात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिखली प्राधिकरण केंद्राच्या सेवेकऱ्यांची दिवाळी फराळ भेट

पिंपरी चिंचवड/,क्रांतिकुमार कडुलकर : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) राजे शिवाजीनगर,चिखली प्राधिकरण,पेठ क्र.16 येथील सेवेकाऱ्यांनी (दि.9 नोव्हेंबर) रोजी पिंपरी येथील ‘सावली निवारा केंद्र’ येथील 65 निराधार नागरिकांना दिवाळी फराळ भेट वितरित करून शुभेच्छा दिल्या.

कुटुंबानी टाकून दिलेल्या फुटपाथ, सिग्नलवर उपेक्षित विमनस्क, निराश असलेल्या लोकांसाठी ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोना महामारी काळात पिंपरी चिंचवड मनपाने या निवारा केंद्राची स्थापना केली.’रिअल लाईफ-रिअल पीपल’ या सेवा भावी संस्थेमार्फत येथील स्त्री पुरुषांचे संगोपन केले जाते.असे सावली निवारा केंद्राचे संचालक व रिअल लाईफ-रिअल पीपल या संस्थेचे संस्थापक एम. ए. हुसेन यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले.



आध्यात्म आणि समाजसेवेतून सांकृतिक परंपरा हे गुरुमाऊलीचे तत्वज्ञान आहे.

उघड्यावर आयुष्य जगणाऱ्या लोकांचे बेघरांची सेवा करणाऱ्या येथील सेवकांपासून समाज सेवेचा आदर्श शिकून घेतला पाहिजे,गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व चंद्रकांतदादा मोरे यांच्या प्रेरणेतून आम्ही संपूर्ण राज्यात व देशात सामाजिक कार्य करत आहोत,स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी देविदास भोंग यांनी सांगितले

नको असलेल्या लोकांना रस्त्यावर सोडून देणे ही सामाजिक विकृती आहे,इथे तर प्रत्यक्ष ज्यांचे कोणी वारस नाहीत,अशा अनोळखी उपेक्षितांना, पामराना निवारा केंद्रात आधार दिला जात आहे, विमनस्क, अपंग महिला ,पुरुषांची कठीण सेवा इथे केली जात आहे, या मानवतावादी कार्यात आमचा सहभाग वाढवू, असे सेवेकरी महेश पोळ यांनी आश्वासन दिले.



पुणे जिल्हा संचालक सतीश मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पोळ, अशोक जाधव, सचिन थोरवे, सचिन बिरले, रामेश्वर निकम, विश्वनाथ पवार, देविदास भोंग, बंडू जमदाडे, संजय हजारे, संतोष खिरे, संजय मामडगे, लकीचंद गुजर, शिवाजी केदारी, कुलदीप राठोड, गोरक्षनाथ काकडे, शिवाजी साधुले व सर्व सेवेकरी या दिवाळीत पुणे जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित)च्या वतीने ग्रामीण भागात दिवाळी फराळ वितरण मोहीम राबवत आहेत.अशी माहिती सेवेकरी महेश पोळ यांनी दिली.

‘वुई टूगेदर फाउंडेशन’ चे अध्यक्ष सलीम सय्यद यांनी प्रास्ताविक केले. ‘रिअल लाईफ-रिअल पीपल’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक एम. ए. हुसेन यांनी श्री स्वामी समर्थ केंद्र चिखली प्राधिकरणचे आभार मानले. सावली निवारा केंद्राचे गौतम थोरात,सचिन बोधनकर, अग्नेश फ्रान्सिस, मिलिंद माळी, अमोल भाट, सुनिता श्रीनाथ, लक्ष्मी वाईकर, उमा भंडारी, वंदना नायडू यावेळी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles