Monday, April 7, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : फेरीवाल्यांवरील कारवाई थांबल्याने पोटदुखी ; फसवणारे आणि चुकून २७ मतानी केवळ १ जागा निवडून आलेल्यांनी आत्मपरीक्षण करावे

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ शहरातील फेरीवाल्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा (PCMC)

आम्हाला ८ पैकी ६ जागा निवडून देऊन फेरीवाल्यानी त्यांची जागा दाखवून दिली

पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्यमातून शहरातील अनेक विक्रेत्यांच्या न्याय देऊन हॉकर झोन, फेरीवाला प्रमाणपत्र वाटप, व्यक्तिमत्व विकास इत्यादी बाबी करण्यात यश आलेले असून महानगरपालिका अन्यायकारक कारवाई करत आहे म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही गेलो असता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली हे सर्व जगाला माहित आहे, परंतु अज्ञानी लोकांना अजून काय स्थगिती असते ? काय निर्णय असतो हेच माहीत नाही या उलट ते समजून न घेता सर्वसामान्य गोरगरीब फेरीवाल्यांना मिळालेला न्याय त्यांच्या पचनी पडलेला नाही म्हणून विजयी गुलाल उधळणाऱ्या फेरीवाल्यांचा आनंद पाहून त्यांची पोटदुखी सुरू झालेली असून शहरातील फेरीवाले त्यांना चांगलेच ओळखून आहेत त्यांनी आता तरी चांगले विचार करावेत असा टोला महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने दिला आहे. (PCMC)

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रचंड बहुमताने विजयी झालेले शहर पथ विक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, प्रल्हाद कांबळे, राजू बिराजदार, प्रल्हाद कांबळे, सलीम डांगे, अलकाताई रोकडे, किसन भोसले, संभाजी वाघमारे, बालाजी लोखंडे, रवींद्र गायकवाड, सुनील भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ज्यांनी वर्षानुवर्ष फेरीवाल्याना फसवले वर्षानुवर्ष त्यांची दिशाभूल केली ते आज ज्ञान पाजळत असून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या सौ. संगीता दत्तात्रय शेरखाने यांना मिळालेली मते हे अधिक असून केवळ शिक्का न मारता अंगठा मारला म्हणून त्यांची मते बाद झाल्याने निवडून आलेल्यांनी शहरातील सज्ञान विक्रेत्याला ज्ञान शिकवू नये . ज्यांनी कधी गोरगरीब पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे काम केले नाही, कायमस्वरूपी दिशाभूलच केली ज्यांनी त्यांच्यासाठी कधी कोर्टाची पायरी चढली नाही व गेले असतील तर त्यांना यश मिळाले नाही त्यांना आम्हाला मिळालेल्या यश पचनी पडलेले नसून त्यांची पोटदुखी वाढली आहे. (PCMC)

फेरीवाल्यावरिल कारवाई थांबलेली त्यांना ती बरी वाटत नाही. फेरीवाले त्यांचेकडे जात नाहीत याचे त्यांना त्याचे दुःख झाले आहे, आमच्या संबंधित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रति दिलेल्या असून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्वांसाठी असतो त्यांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा संकोच नाही मात्र प्रत दिली नाही म्हणून अश्रू काढणे योग्य नाही ज्यांनी आयुष्यामध्ये कधी विजय मिळवला नाही, आणि गुलाल उधळला नाही त्यांना आम्ही उतरलेल्या गुलालाचा पोटदुखी होणे साहजिक आहे आम्ही उधळलेल्या गुलालाचे शहरातील ३० हजार विक्रेत्यांनी कौतुक केले आहे.

टीका करून फेरीवाल्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत समितीमध्ये आमचे बहुमत आहे फेरीवाल्यांचे चांगले करण्याची इच्छा मनात असेल तर आमच्या सोबत येऊन काम करावे असा सल्ला सुद्धा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पदाधिकारी यांनी दिला आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles