पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातील अनेक टेनिस ग्राउंड हे पुण्यातील एकाच नंदनबाल या ठेकेदाराला दिले आहेत. त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू आणि शिक्षक यांना सरावाठी ते उपलब्ध होत नसल्याने त्या ठेकेदार संस्थेला दिलेले ग्राउंड काढून घेण्यात यावे अथवा काही ठराविक वेळेत त्यांनी त्याचा वापर करावा, असा आदेश देण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी निवेदाद्वारे मा. आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे. (PCMC)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने शहरातील खेळाडू यांना सरावासाठी अथवा खेळण्यासाठी ६ ग्राउंड तयार करण्यात आले आहे. त्यातील काही ग्राउंड नंदनबाल ठेकेदार यांना देण्यात आले. त्यांच्याकडे जे ग्राउंड कडून चालवण्यात येतात त्याठिकाणी पिंपरी चिंचवड शहर व इतर खेळाडू अथवा क्रीडा शिक्षक यांना त्याचा वापर करता येत नाही. (PCMC)
क्रीडा शिक्षक उपलब्ध करा
मोहन नगर येथील टेनिस ग्राउंड हे ५ वर्ष त्या ठेकेदार नंदनबाल यांना देण्यात आले.पण प्रत्यक्षात तेथे कोणीच खेळाडू शिकण्यासाठी येत नाही कारण तेथे प्रशिक्षित क्रीडा शिक्षक उपलब्ध नाहीत, त्यामुळे परिसरातील नागरिक आपल्या मुलांना तेथे पाठवत नाही. असे निदर्शनास आले आहे. तसेच संभाजी नगर , गणेश तलाव तसेच चिखली येथील अनेक टेनिस ग्राउंड कोणत्याही वापराविना तसेच पडून आहे. असे राहुल कोल्हटकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. (PCMC)
तरी परिसरातील नागरिक तसेच खेळाडू क्रीडा शिक्षक यांच्या वतीने सदर निवेदनाच्या माध्यमातून आपणांस विनंती आहे की , शहरातील खेळाडू यांना सरावासाठी तसेच नवीन खेळाडू घडविण्यासाठी आपल्याच शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशातून उभे केलेले हे टेनिस ग्राउंड आपल्याच शहरातील होतकरू खेळाडू , क्रीडा शिक्षक तसेच नागरिक यांना खेळण्यासाठी व चालवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे.
याकरिता सर्व टेनिस ग्राउंड हे पूर्वीसारखे ऑनलाईन नोंदणी पद्धतीने चालू करावे, अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी केली आहे.