अन्यथा छावा स्टाईल ने आंदोलनाचा इशारा..! (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रेशन दुकानावरील धान्याच्या काळा बाजाराला आळा घालण्यासाठी आणि धान्य वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी ई पॉस मशीन प्रणाली व्यवहारात आणली गेली, परंतू ई पॉस मशीन सर्व्हर वारंवार बंद पडत असल्या कारणाने सर्वसामान्य गरीब गरजू नागरिकांना रेशन दुकानावरून धान्य वेळेत मिळत नाही त्याचा फटका रेशनकार्ड धारकांना बसत आहे हा प्रकार नेहमीचाच झाला आहे.त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून जनतेच्या मूलभूत अधिकारावर जाणीवपूर्वक गदा आणणारी आणि अन्न आणि पुरवठा विभागासह सरकारचे मोठे अपयश आहे. (PCMC)
हा प्रकार कायमचा थांबला पाहिजे इतर शासकीय सर्व्हर व्यवस्थित चालतात याच सर्व्हर ला वारंवार अडथळा का येतो ? की मुद्दाम ऑनलाइन प्रणाली वर प्रश्न निर्माण करुन ऑफलाईन धान्य वाटप करायचे आणि रेशन दुकानदारासह अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का यावर अभ्यासपूर्ण संशोधन करून हा विषय कायमचा मार्गी लावण्याची मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने करण्यात आली. (PCMC)
सर्व्हर वर जास्त लोड आल्यानंतर जी उपाययोजना त्वरित करायची असते ती म्हणजे त्याची होस्टिंग वाढवणे किंवा बँड विडथ वाढवणे सर्वर डाऊन का होतोय ते पाहणे,ई पॉस मशीन मध्ये सतत एरर येत असेल किंवा ती मशीन हँग होत असेल तर नवीन तंत्रज्ञानाची ई पॉस मशीन बसवणे गरजेचे असते.हे या साधे आणि सरळ काम आहे ते सुद्धा पुरवठा विभागा मार्फत केले जात नाही.
तर इतर वेळी सुद्धा रेशन दुकानदाराकडून रेशनकार्ड धारकांना धान्य वितरित केल्यानंतर ई पॉस मशीन प्रणाली द्वारा निघणारी पावती दिली जात नाही मागणी करून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बऱ्याच दुकानातून भावफलक, माहिती फलकच गायब झाले आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. मशीनवर थंब दिल्यानंतर ई पॉस मशीन मधून निघणारी पावती यावर कार्ड धारकाची त्या कुटुंबाला मिळणाऱ्या लाभाची सर्व माहिती सविस्तर असते आणि हीच माहिती पावती न देता दडवली जात आहे.
त्यामुळे गरीबांच्या हक्काच्या धान्यावर पावती न देता मंजूर धान्यापेक्षा कमी धान्य देऊन फसवणूक केली जात आहे.त्यामुळे हे सर्व चुकीचे प्रकार त्वरित थांबवून गरीब जनतेला न्याय द्या अन्यथा छावा स्टाईल ने आंदोलन करुन जनतेला न्याय देवू. तर ऑफलाईन धान्य वाटप न करता ई पॉस मशीन द्वारेच धान्य वितरित करण्यात यावे. तसेच या महिन्यात येणारा आनंदाचा शिधा सुद्धा ई पॉस प्रणालीद्वारा वितरीत व्हावा.
तसेच जर दोन दिवसात हे गैरप्रकार थांबले नाहीत तर संघटनेच्या वतीने प्रत्येक रेशन दुकानावर जाऊन ई पॉस मशीन द्वारा पावती प्रमाणे धान्य देऊन नियमाप्रमाणे धान्य वाटप करू असा इशारा छावाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांनी अन्न आणि पुरवठा विभागाचे उप आयुक्त दिनेश तावरे यांची भेट घेऊन दिला.
यावेळी छावाचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा निलम सांडभोर, शहराध्यक्ष निशाताई जाधव उपस्थित होते.
हेही वाचा :
पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला
मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?
Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार
ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू