पिंपरी चिंचवड – चिंचवडगावातील मुख्य बाजारपेठ असलेला गांधीपेठेतील चिंचवडचा राजा चौकात स्पीड ब्रेकर बसविण्यात आला, त्याचे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. (PCMC)
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर ‘चिंचवडचा राजा’ मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेश मिरजकर, माजी अध्यक्ष प्रमोद बरडिया, स्थानिक व्यापारी प्रसाद संगमनेरकर, यश बरडिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
चिंचवडगावातील गांधीपेठ चिंचवडचा राजा चौक म्हणजे अत्यंत गजबजलेला परिसर व या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी व छोटी मोठी वाहने जोरात चालवणे या प्रकारांमुळे अपघाताचे प्रकार सतत घडत होते. या सर्व घटनांमुळे गांधीपेठेतील नागरिक त्रस्त होते व या ठिकाणी चारी बाजूंनी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी सातत्याने होत होती. (PCMC)
स्थानिक माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राहुल कलाटे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ चिंचवडे, योगेश चिंचवडे यांसह श्री संत ज्ञानेश्वर ‘चिंचवडचा राजा’ मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेश मिरजकर, मंडळाचे सर्व कार्यकर्ते व स्थानिक व्यापारी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आज गुरुवार दिनाक १० एप्रिल रोजी महापालिकेच्या वतीने स्पीड ब्रेकर बसविण्यात आले.
स्पीड ब्रेकर बसवल्या मुळे निदान अपघात होण्याच्या घटना बंद होतील अशी आपेक्षा चिंचवडकर नागरिक करत आहेत.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : चिंचवडगावातील ‘चिंचवडचा राजा’ चौकात आजपासून स्पीड ब्रेकर
---Advertisement---
- Advertisement -