ई- क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अधिकाऱ्यांची बैठक
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : रस्ते, पाणी आणि कचरा विषयक समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, पावसाळ्यात यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. pcmc news
भोसरी विधानसभा मतदार संघातील ई- क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रलंबित समस्या आणि पावसाळा पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त राजेश आगळे यांच्यासह विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मोशी गावठाण, गंधर्व नगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखलेमळा, अलंकापुरम सोसायटी, वडमुखवाडी, काळजेवाडी, ताजणेमळा, चोविसावाडी, च-होली, डुडूळगाव, दिघी, गजानन महाराज नगर, भारतमातानगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर, कृष्णानगर, व्ही.एस.एन.एल. गणेशनगर, रामनगर, बोपखेल गावठाण, रामनगर, संत तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्री पार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, संत ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहत भाग तसेच, शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅंडविक कॉलनी, खंडोबा माळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर या भागातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. pcmc
तापकीर वस्ती, चऱ्होली वडमुखवाडी येथील खड्डे दोन दिवसांत बुजवणे, मोशी येथील नवीन देहू आळंदी रस्त्यावर चौधरी ढाब्यासमोर ड्रेनेज लाईनमधील चेंबर दुरूस्त करणे. जय गणेश लॉन्सच्या समोरील रस्ता, वाय जंक्शन मोशी-डुडुळगाव येथील रस्ता प्रशस्त करणे. डुडूळगाव येथील सचिन पवार यांच्या शेतातील जलनिस्सारणाची लाईन दुरूस्त करणे. रवितेज सोसायटी, सस्ते तालीम, राधाकृष्ण नगर मोशी येथील ड्रेनेज साफसफाई करणे. काळी भिंत येथील ड्रेनेज साफसफाई करणे. गंधर्व नगरी आणि फातिमानगर येथील ड्रेनेज वारंवार चोकअप काढणे. भोसले वस्ती नाला आणि सरपंच वस्तीनाला सफाई करून घेणे. पांडुरंग हॉटेल जवळचा नाला सफाई करून घ्यावी, अशा सूचना आमदार लांडगे (Mahesh Landge) यांनी केल्या आहेत.
तसेच, प्रभाग क्रमांक ४ मध्ये स्मशानभूमी, दिघी येथील ड्रेनेज लाईन, विजयनगर कॉर्नर, दिघी घरांमध्ये पाणी शिरते, साई पार्कमध्ये पाणी शिरते, गणेश नगर गजानन महाराज नगर येथे पावसाळी पाण्याची समस्या आहे. दिघी मधील स्ट्रॉंम वॉटर लाईन सर्व स्वच्छ करून घेणे. मंजुरी बाई शाळेजवळ पावसाळी पाण्याची समस्या मार्गी लावणे. दिघी मधील सर्व खड्डे दुरुस्त करून घेण्याच्या कामाला गती देण्याची सूचना करण्यात आली. pcmc
गवळीनगरमधील समस्या सुटणार!
प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर येथील गंगोत्री पार्क रोड खड्डे बुजवणे, मंगलमूर्ती मेडिकल ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणे, स्वामी समर्थ नगर येथील नाल्याची स्वच्छता करणे, महादेव नगर येथील ड्रेनेज लाईन साफसफाई करून घेणे, संत ज्ञानेश्वर हायस्कूल आळंदी रोड भोसरी येथील ड्रेनेज सफाई, दिघी रोड येथे स्वच्छतागृहाची सफाई करून घेणे. महाराष्ट्र चौक दुर्गा माती कॉलनी ड्रेनेज सफाई, सँडविच कॉलनी दिघी रोड येथे दुथर्व असलेल्या झाडांची छाटणी करणे. तसेच, प्रभाग क्रमांक ७ मधील जनाईड्स हाइट्स पावसाळी पाणी समस्या, आळंदी रोड आणि दिघी रोड खड्डे बुजवण्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.


हेही वाचा :
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये
सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!
ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी
ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय