पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंगळे गुरव येथे काव्यात्मा साहित्य परीषद पुणेच्या वतीने विविध क्षेत्रातील राज्यभरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुस्तक, सन्मान चिन्ह ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. (PCMC)
परिवर्तनाच्या चळवळीचा धागा पकडून ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण जीवनाचा मुलमंत्र देताना म्हणाले कि,”ज्यांना कुणीच नाहीत, मुले बाळे ही नाहीत, त्यांनी त्यांच्या वंशासाठी झाडे लावावीत म्हणजे आयुष्यात निराशा पदरी पडणार नाही असा मनोदय ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांनी पुरस्कार वितरणाच्या वेळी व्यक्त केला. (हेही वाचा – ब्रेकिंग : भारताच्या माजी कर्णधारावर समलैंगिक असल्याचा पत्नीचा खळबळजनक आरोप)
वृक्ष स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात यातून माणसांनी बोध घेणे गरजेचे आहे. परोपकाराची भुमिका नेहमी घेतात स्वतः उन्हात राहून इतरांना सावली देतात तसे चांगल्या विचारांची माणसंच जिवनात प्रकाश निर्माण करतात यातून समाजाला दिशा मिळते, असे पुरुषोत्तम सदाफुले यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. (हेही वाचा – कुणाल कामराच्या प्रकरणावर ध्रुव राठीने दिली प्रतिक्रिया, पैसेही पाठवले)
दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण करणारे वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, “आयुष्याची किंमत करायची असेल तर वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे तेव्हाच आयुष्याचा प्रवास अधिक प्रमाणात सुखकर होईल आणि माणसाला सुखाचा अनुभव कायम घेता येईल. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)
आण्णा जोगदंड म्हणाले कि गांधीवादी विचारांचे शिक्षणतज्ञ, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष “पद्मभूषण कै.बाळासाहेब भारदे समाजभुषन” पुरस्कार दिल्यामुळे माझ्यावर सयोजकांनी पुरस्कार रूपाने जबाबदारी दिली आहे, ती गांधीवादी विचारांची जबाबदारी मी अधिक क्षमतेने पार पाडील असा विश्वास व्यक्त केला. (PCMC)
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मध्ये अण्णा जोगदंड (कै. बाळासाहेब भारदे समाजभूषण, कवयित्री शोभाताई जोशी (काव्यसाधना जीवन गौरव पुरस्कार), सुहास घुमरे (गझलकार प्रकाशदादा बनसोडे पुरस्कार), कवी किसन म्हसे (काव्य प्रतिभा पुरस्कार), कवी जितेन सोनवणे (शब्दप्रभू काव्य पुरस्कार), अरविंद सगर (गझल काव्य विशेष सन्मान पुरस्कार), विजय जाधव (काव्यात्मा जनजागृती सेवा पुरस्कार), कामुदास चव्हाण (कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षक पुरस्कार), ज्ञानेश्वर किर्दंत (महात्मा ज्योतिबा फुले समाज भूषण पुरस्कार), जाकीर लतिफ मुलानी (काव्यात्मा श्नमप्रतिष्ठा पुरस्कार) राहूल जाधव (काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार) आणि शरद काणेकर ( काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार), यानंतर काव्य जागर संमेलन प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. माणसा माणसाला जोडून ठेवण्याचे सामर्थ्य कवितेत असते, म्हणून कविता ही समाज कल्याणाच्या हिताचा कायम विचार करत असते असा भावार्थ अनिल दिक्षित यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. (PCMC)
राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास 35 कवी, कवयित्रीनी दमदार कविता सादर केल्या.
यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण, पुरुषोत्तम सदाफुले, श्नीकांत चौगुले, महेंद्र भारती, वृक्षमित्र अरुण पवार, सविता इंगळे, प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित, सुरेश वाकचौरे,महेमूदा शेख होते.
या कार्यक्रमाच्या संयोजनात सुरेखा हारे, संगिता जोगदंड, दत्तूभाऊ ठोकळे, संजय साळुंखे, महेश क्षिरसागर आणि मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम हारे यांनी केले, सुत्रसंचालन दिनेश भोसले यांनी केले व या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संजय साळुंखे यांनी केले.