पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – देशभरामध्ये असलेल्या असंघटित कामगारांमध्ये ९३ % संख्या ज्यांची आहे त्या असंघटित कामगार यांच्यासाठी ई.एस.आय.सी.योजना लागू करावी, अपघाती विमा संरक्षण मिळावे, त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा मिळावी यासह इतर मागण्या घेऊन देशभरातल्या १२ राज्यातून आलेली यात्रा आज पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. (PCMC)
यात शहरातील घरेलू कामगार, बांधकाम कामगार,फेरीवाला, रिक्षा चालक, कंत्राटी कामगार यांनी यात्रेत सहभागी होऊन मागण्या या यात्रेत मांडल्या.
वर्किंग पीपल्स कॉलिशन, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, क्रांती कष्टकरी असंघटित कामगार कल्याणकारी संघ, बांधकाम कामगार समिती, घरेलू कामगार महासंघ यांच्यातर्फे आज पिंपरी चिंचवड शहरातील थरमॅक्स चौक येथून दुर्गानगर, यमुनानगर मार्गे भक्तीशक्ती शिल्पापर्यंत पोहोचली. मोठ्या घोषणा देत असंघटित कामगारांनी आपल्या मागण्या बुलंद केल्या. यावेळी भक्ती- शक्ती समूह शिल्पाला पुष्प अर्पण करून यात्रेचे सभेत रूपांतर करण्यात आले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2025/02/1000696933-1024x691.jpg)
यावेळी सुभाष लोमटे, राजू भिसे, नितीन पवार, कसमचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, श्वेता दामले, वृषाली पाटणे, सचिन नागणे, किरण साडेकर, सुनील भोसले, राजू बिराजदार, इरफान चौधरी, सचिन नागणे, लाला राठोड, सलीम डांगे, माधुरी जलमुलवर, शैलजा चौधरी, बालाजी लोखंडे, तुषार घाटूळे, सिद्धनाथ देशमुख,bबबलू ओव्हाळ, युवराज निळवर्ण, सलीम शेख, नंदू आहेर, इंदुबाई वाकचौरे आदी उपस्थित होते. (PCMC)
असंघटित कामगारांसाठी सुमारे १२ राज्यांमधून कन्याकुमारीपासून ते दिल्लीपर्यंत ही यात्रा होत असून महाराष्ट्र राज्यामध्ये सांगली, सातारा, पिंपरी चिंचवड, लोणावळा, नवीमुंबई सुरत मार्गे दिल्लीकडे रवाना होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये असंघटित कामगारानी यात्रेचे जोरात स्वागत करीत यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यामध्ये रिक्षा चालक, घरेलू कामगार,बांधकाम कामगार,फेरीवाला,कंत्राटी कामगार यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता
किरकोळ महागाई निर्देशांक ५.४९ टक्क्यावर पोहोचला असून वाढत्या तेलाच्या किमती, अन्नधान्य, भाजीपाला, डाळी यांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य आणि कामगारांना मिळणारे वेतन अल्प आहे.
किमान आणि समान वेतनाची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे सर्व असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी, किमान आणि समान वेतनाची अंमलबजावणी व्हावी,कामगारांना ईएसआयसी योजनेचा लाभ द्यावा, त्याचबरोबर मनरेगा योजनेतून कामाचे दिवस वाढवून काम आणि वेतन मिळावे, अपघाती विमा संरक्षण मिळावे अशा अनेक कामगारांनी सद्यस्थिती व्यथित केली. यावेळी सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी यांनी भाषणाद्वारे आपले मते व्यक्त केली यानंतर यात्रा लोणावळा कडे मार्गस्थ झाली.