पिंपरी चिंचवड – वुई टूगेदर फाउंडेशन नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निस्वार्थी उपक्रम घेत असते.खर तर अनेक वेळा समाजात काही लोकांचे कर्तृत्व असूनही त्यांचा गौरव होत नाही किंवा पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही.ते नेहमी कौतुक व फायद्यापासून वंचित राहतात. (PCMC)
वडगाव मावळ, नवलाख उंबरे मधील 3 मुली 2 मुले असे पाच कबड्डी खेळाडू नुकतेच हिमाचल प्रदेश मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी गेले होते त्यांनी मोठे यश प्राप्त केले.
खर तर ही खूप मोठी स्पर्धा होती यासाठी या मुलांनी अभ्यासा सोबत कबड्डी सराव सुरु ठेवला होता, ही तारेवरची कसरत करून त्यांनी विजय प्राप्त करून आणला. त्यांचे प्रशिक्षक यांनी अत्यंत स्वतःला त्या मुलांसाठी झोकून देऊन दिवस रात्र त्यांचा सराव करून घेतला. (PCMC)
खरे तर असे कसरत करून यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान नक्की झालाच पाहिजे, म्हणून वुई टूगेदर फाउंडेशनच्या वतीने व आदर्श शिक्षिका मंगला डोळे – सपकाळे यांच्या पुढाकाराने या मुलांचा व प्रशिक्षकाचा ट्रॉफी,शाल,गुलाब देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी प्रास्ताविक मध्ये आपले मनोगत व्यक्त केले व या खेळाडूंनी ग्रामीण भागात राहत आपल्या घरची कामे करीत अभ्यास करीत कबड्डी मध्ये यश प्राप्त करणे खरोखर अभिमानास्पद आहे खेळाडूंना शाबासकी देऊन अभिनंदन केले.
या वेळी प्रशिक्षक प्रतिक भोर, यांनी या स्पर्धेविषयी खडतर प्रवास वगैरे माहिती दिली, तर खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या व वुई टूगेदर फाउंडेशनने खेळाडूंची निस्वार्थी दखल घेऊन जाहीर सत्कार केला म्हणून ऋण व्यक्त केले. (PCMC)
प्रशिक्षक म्हणून प्रतिक भोर यांनी सहयोग दिला,प्रथम क्रमांक आदिती ओव्हाळ, तर मृणाल कोतुळकर, मानसी दरेकर, प्रशिक बेले, दुर्गेश गायकवाड, यांनी द्वितीय क्रमांक मिळवीला
फाउंडेशन सचिव मंगला डोळे – सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले.
फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, सचिव मंगला डोळे – सपकाळे, लायन्स क्लब अध्यक्ष रवींद्र काळे, सलिम सय्यद, सल्लागार,रवींद्र सागडे, दिलीप पेटकर, शंकर कुलकर्णी, धनंजय मांडके, श्रीनिवास जोशी, सदाशिव गुरव अरविंद पाटील, विलास गटणे आदी पदाधिकारी, मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
सलीम सय्यद यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.