पिंपरी चिंचवड – प्रगतीशील आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प महायुती सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला. त्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. उद्योग- रोजगार, पायाभूत सुविधा आणि वाहतूक, कृषी आणि जलसंधारण, हरित आणि अनुकूल प्रकल्प, सहकार आणि ग्रामीण विकास यासह महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, प्रकल्प आणि कार्यक्रम असलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने जाहीर केला. राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत. (PCMC)
नवीन औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाखाहून अधिक रोजगारनिर्मितीचा संकल्प आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
PCMC : विकसित महाराष्ट्राचा ‘‘संकल्प’’ : आमदार महेश लांडगे
- Advertisement -