पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज निगडी भक्ती शक्ती शिल्पसमूह येथे रविवार दिनांक 29-10-2023 सकाळी 11 वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे, उपोषणासाठी मराठा बांधव शिवश्री नवीन भालेकर व शिवश्री माऊली देशमुख हे दोघे अमरण उपोषणासाठी भक्ती शक्ती आण्णा भाऊ साठे पुर्णाकृती स्मारका समोर निगडी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत.
सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून सक्रिय जाहीर पाठिंबा संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुना लावीत आहेत.असे स्पष्ट मत दाखले यांनी मांडले मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/10/ac4161f0-909b-42ca-8641-c556b3adf2ec-1024x768.jpeg)
दरम्यान जरांगे पाटील उपोषण करीत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय?
सरकार मन की बात करत आहे, पण त्यांचे मन निर्दय आहे
जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही त्यांच्या जिवाचं काही बरेवाईट झाल्यास सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ हे कदापी सहन करणार नाही सरकारला याची किंमत चुकवावी लागते असा इशारा दाखले यांनी दिला.
यावेळी मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, युवराज दाखले,संजय धुतडमल,डि पी खंडागळे, भानुदास कांबळे, आण्णा कसबे, युवराज चाखले, अविनाश शिंदे, बापु वाघमारे, नितीन घोलप, रामेश्वर बावने, तुकाराम चव्हाण, मोहन भिसे, साहेबराव साळवे, राजु आवळे, बाळासाहेब खंदारे, शंकरराव खुडे, रामदास कांबळे, माणिक पौळ, नानासाहेब कांबळे, मारूती काळे, नवनाथ कांबळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.