Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : रहाटणी येथील तिरंगा मित्र मंडळाकडून गौरी सजावट व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – रहाटणी येथील तिरंगा क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गौरी सजावट, महिलांची संगीत खुर्ची, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, रनिंग, डान्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. (PCMC)

स्व. भरत (अप्पा) कोकणे सांस्कृतिक मैदान यशवंतनगर रहाटणी येथील सिंहगड, राजगड, सज्जनगड कॉलनीमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजप्रबोधनकार शारदा मुंडे, शिवाजी विद्यालय निलंगाचे प्राचार्य ॲड. दिलीप सातपुते, डॉ. नंदकुमार धुमाळ, राजश्री सावंत, शांता कोकणे, माजी नगरसेवक गोपाळ माळेकर, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.

---Advertisement---


यावेळी बोलताना अरुण पवार म्हणाले, तिरंगा मित्र मंडळ हे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नावारूपाला आलेले मंडळ आहे. या मंडळाकडून नियमितपणे समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच सर्वांच्या सुख-दुःखात या मंडळाचे कार्यकर्ते सहभागी होत असतात.

प्राचार्य दिलीप सातपुते यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडविले असल्याचे सांगत, इंग्रजीचे ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके माझे विद्यार्थी आहेत, मी असे चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. असे प्राचार्य दिलीप सातपुते यांनी सांगितले.

शारदा मुंडे यांनी तिरंग्याबद्दल माहिती सांगून तिन्ही कॉलनीचे मिळून तिरंगा मित्र मंडळ नाव आहे. गोपाळ माळेकर म्हणाले, मी या मंडळाचा सभासद आहे. या मंडळामुळेच मी राजकारणात यशस्वी झालो आहे.

बाळासाहेब साळुंके यांनी सांगितले, की आम्ही मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवत आलो आहोत. मंडळाला तीनवेळा दगडूशेठ हलवाई गणपतीचे पारितोषक मिळाले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमी काम करत राहू. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून चांगले संस्कार व मार्गदर्शन करण्याचे काम मंडळ करत आहे.

यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल कोकणे, उपाध्यक्ष ज्योतिबा पाटील, तानाजी चौगुले, प्रकाश देशमुख साहेबराव धुमाळ, नागनाथ लोंढे, दिनेश पवार, अकबर शेख, राजाराम कोकणे, राजेश बोराडे, ज्ञानेश्वर डोके, निंबाजी जाधव, सुरेश पवार, अविनाश चव्हाण, संतोष जगताप, संकेत चौगुले, दत्ता जाधव, बब्रुवान ढेपे, नारायण खामकर, गोविंद वलेकर, उद्योजक सतीश बागुल, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
PCMC

रामेश्वर गटकळ यांनी प्रास्ताविक लक्ष्मण सुतार यांनी सूत्रसंचालन, तर प्रफुल्ल कोकणे यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles