Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ४८,७६३...

PCMC : अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ४८,७६३ जणांनी घेतला लाभ

PCMC

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित या शिबिरात पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांनी हजेरी लावत मोफत आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला. (PCMC)

शिबिराच्या पहिल्याच दिवशी ४८,७६३ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आणि विविध वैद्यकीय सुविधांचा लाभ घेतला. त्यात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच पाचशेहून अधिक दिव्यांग बांधव सहभाग झाले होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now


लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ६२व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC)

महा शिबिराचे मुख्य संयोजक व पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनी ही माहिती दिली.


शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकृष्ण पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामनाथ येमपल्ले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपजिल्हाधिकारी यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख, माजी महापौर माई ढोरे, परिमंडल अधिकारी विजयकुमार क्षीरसागर, उद्योजक विजूशेठ जगताप, नामदेव ढाके, विलास मडिगेरी, राजेंद्र राजापुरे, मोरेश्वर शेडगे, तुषार हिंगे, सचिन चिंचवडे, संतोष कांबळे, हर्षल ढोरे, शेखर चिंचवडे, बाबा त्रिभुवन, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, सागर आंगोळकर, डॉ. देविदास शेलार, विनायक गायकवाड, सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, सनी बारणे, संदीप गाडे, महेश जगताप, शिवाजी कदम यांसह महिला पदाधिकारी सविता खुळे, उषा मुंडे, आरती चोंधे, नीता पाडळे, शारदा सोनवणे, मनीषा पवार, निर्मला कुटे, कुंदा भिसे, भारती विनोदे उपस्थित होत्या. (PCMC)

तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्ते यांचीही उपस्थिती लाभली.


मोफत आरोग्य सुविधा आणि तपासण्या

शिबिरात कॅन्सर तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासण्या, डायलिसिस, नेत्ररोग तपासणी, कृत्रिम अवयव वाटप यांसारख्या मोफत सेवा पुरविल्या जात आहेत. तसेच हृदय रोग, किडनी विकार, लिव्हर प्रत्यारोपण, कॅन्सर उपचार, हाडांचे विकार, स्त्रीरोग, बालरोग, न्यूरोथेरेपी, आयुर्वेदिक उपचार यांसाठीही मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले जात आहेत.

प्रमुख रुग्णालयांचा सहभाग

या शिबिरात ससून हॉस्पिटल, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल यांसारखी नामांकित रुग्णालये सहभागी झाली आहेत.

शिबिराचा कालावधी आणि वेळ

हे महाआरोग्य शिबिर उद्या शनिवारी १ मार्च २०२५रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (PCMC)

आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्य वाटप

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता दिव्यांगांना आवश्यक साहित्य व उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राजेंद्र राजापुरे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालनाची जबाबदारी नाना नवले यांनी पार पाडली. मोरेश्वर शेडगे यांनी आभार प्रदर्शन केले.

नोंदणीसाठी संपर्क:

वेबसाईट: www.spjfoundation.com
फोन: ८७६७८५७६११, ७५७५९८११११