अन्न व औषध प्रशासनाकडून हातगाडी, स्टॉल धारकांना प्रशिक्षण यशस्वी (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारक यांनी चहा, वडापाव,भजी, समोसा, फळे,भाजी मिसळपाव, पाणीपुरी इत्यादी पदार्थ विक्री करत असताना स्वच्छ व सुरक्षित अन्न नियमाप्रमाणे अन्न परवाना घ्यावा तसेच अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आणि अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन ए आर देशमुख यांनी आज केले. (PCMC)
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य व नॅशनल हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉलधारक अन्नपदार्थ विक्रेत्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे ५२५ अन्न पदार्थ विक्रेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. (PCMC)

प्रशिक्षण सोहळ्याची सुरुवात संत गाडगेबाबा यांना स्मरून दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त अन्न ए. आर.देशमुख, सहाय्यक आयुक्त अन्न एस.एस. क्षीरसागर, फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, प्रशिक्षक डॉ.देवयानी साळुंखे, समन्वयक प्राजक्ता दुधाळ, पथविक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार, किसन भोसले, अलका रोकडे, सलीम डांगे प्रदेश संघटक अनिल बारवकर, सामाजिक कार्यकर्ते धुराजी शिंदे, अशोक सोनवणे, सचिन नागणे, संतोष शेलार, वृषाली पाटणे, माधुरी जलमुलवर, रज्जाक शेख, बाबा बारणे, कालिदास गायकवाड, सलीम शेख,अंबादास जावळे, सुनील भोसले, अरुणा सुतार, रेखा कागे, शितल धनगर, राजू पठाण, सुरेश देडे, नंदू आहेर, संभाजी वाघमारे ,मुमताज शेख, जरीता वाठोरे, नंदा तेलगोटे, महादेव गायकवाड, अमोल घुगे, महेंद्र वाघमारे, काशीम तांबोळी, राजेंद्र कुटकर, रमेश बंडगर, संदीप भोसले, वहिदा शेख, अनिल कांबळे, सुशेन खरात मीना अंदगुले आदी उपस्थित होते.
यावेळी शहरातील सांगवी,डांगे चौक पिंपरी,आकुर्डी, चिंचवड, भोसरी, दिघी, बोपखेल,पिंपळे गुरव,रहाटणी, पुनावळे परिसरातील विक्रेते यांनी प्रचंड प्रतिसाद देत ५२५ विक्रेते यात सहभागी घेतला.
नखाते म्हणाले की, ग्राहक आपल्यासाठी महत्त्वाचा असून ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न देणे आपली जबाबदारी आहे ग्राहकाच्या आरोग्याबरोबर आपल्या आरोग्य चांगले राहणे हे महत्त्वाचे आहे आपली स्पर्धा मार्ट आणि मॉल संस्कृतीची असून त्या दृष्टीने आपण नीटनेटकेपणाने तयारी केली पाहिजे, ग्राहकांशी बोलताना नम्रतेने बोलणे त्याचबरोबर महानगरपालिकेचे नियम तसेच स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे, यासाठी महासंघाने संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान सुरू केले आहे.
डॉ.साळुंखे यांनी प्रोजेक्टर वरती चित्रफित दाखवून अन्नसुरक्षा मानके कायदा व सुरक्षित अन्न पदार्थांची हाताळणे त्याचबरोबर विषबाधा टाळणे, पौष्टिक अन्न कशा पद्धतीने ठेवावे खाद्यपदार्थ बनवताना त्यासाठी आवश्यक सामग्री व तयार करताना आणि तयार केल्यानंतर त्याची सुरक्षित काळजी कशी घ्यावी व पौष्टिक आहार कसे तयार करावेत याबाबत मार्गदर्शन केले.
समारोपप्रसंगी विक्रेत्यांनी प्रश्न विचारले त्यावरती तज्ञाकडून उत्तरे देण्यात आली. सुत्रसंचालन शिवलिंग स्वामी यांनी केले तर आभार सलीम हवालदार यांनी मानले.

हे ही वाचा :
इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ
संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!