पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – कोल्हापूरच्या नामांकित आनंदगंगा फाउंडेशन च्या वतीने २०२५ चा पुरस्कार वितरण सोहळा आदर्श गुरुकुल अँकॅडमी कोल्हापूर येथे संपन्न झाला. (PCMC)
आनंदगंगा फाउंडेशन कोल्हापूर यांचे वतीने दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचालित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. अस्मिता बिनय यादव यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, संशोधनकार्य, सामाजिक क्षेत्रातील मोलाची केलेली अतूलनीय कामगिरी व कार्य पाहून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभपूर्वक यथोचित सन्मान प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व गोवा याच्या राज्यातून सुमारे 250 प्रस्ताव आनंदगंगा फाउंडेशन पुरस्कार निवड समितीकडे आले होते. त्यातूनच नारीशक्ती व आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आले. (PCMC)
सदर पुरस्कार समारंभ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचे माजी शिक्षण सभापती अर्थ व शिक्षण समिती कोल्हापूरचे प्रवीण यादव समवेत प्रमुख अतिथी विजयसिंह माने ( अध्यक्ष, अशोकराव माने शिक्षण संकुल ) तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता माननीय डॉ. साधना पाटील ( संचालिका, यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा ), आदर्श गुरुकुल संस्थांचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय घुगरे, आदर्श गुरुकुल संस्थांच्या प्राचार्या डॉ. महानंदा घुगरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आनंदगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. तानाजी पवार यांनी सर्व उपस्थित पुरस्कार प्राप्त शिक्षक व त्याच्या कुटुंबीयांचे आभार मानले. त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कमला शिक्षण संकुलंचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम समवेत सर्व प्राध्यापक वृंन्द व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी प्रा. आस्मिता यादव यांचे कौतुक करून त्याच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. अस्मिता यादव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
---Advertisement---
- Advertisement -