पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : दि.२३ : शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस पडला. त्यामध्ये चिंचवड लिंक रोड, मोहननगर, स्पाईन रोड, पूर्णानगर,आकुर्डी परिसरामध्ये पिंपरी चिंचवड शहरात अतिवृष्टी झाल्याने मोहननगर आकुर्डी, चिखली, पूर्णानगर, घरकुल, स्पाईन रोड, चिंचवड स्पाइन, लिंक रोड, मोशी, निगडी,परिसरातील रस्ते पूर्ण जलमय झाले. pcmc
तासात तब्बल 114 मिलिमीटर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं तसेच काही रस्त्यांवर गुडघ्याइतके पाणी पाहायला मिळालं. यामुळे शहरात महानगरपालिकेने नालेसफाई केले नसल्याचे बिंग फुटल्याचं बोललं जात आहे. नालेसफाई न झाल्याने काही भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचेही बघायला मिळाले. pcmc
सायंकाळी साडेचार ते सव्वा पाच या वेळेत मुसळधार पाऊस झाला.पिंपरी मध्ये झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. शहरातील नाले सफाई झाल्याचे प्रशासनाने झाल्याची माहिती काही आठवड्यापूर्वी दिली होती, मात्र शहर परिसरात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल झाले.


हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन