Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : रहाटणीत लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व,माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, संघर्षशील, लढाऊ व्यक्तिमत्व, लोकनेता कै.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या ९व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, आणि रहाटणी गावातील तमाम मुंडे साहेब प्रेमी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. छत्रपती चौक येथील स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे मार्ग याठिकाणी मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मनोगत व्यक्त करताना मुंडे साहेबांबद्दलच्या आठवणी सांगितल्या.

---Advertisement---



यावेळी कार्यकर्त्यांनी अमर रहे, अमर रहे; मुंडे साहेब अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, मुंडे साहेब आपका नाम रहेगा अशा घोषणांनी देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. याप्रसंगी माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, भाजपा प्रभाग अध्यक्ष माधव मनोरे, दिलीप कुलकर्णी, तानाजी चौगुले, टाटा मोटर्स युनियन प्रतिनिधी नामदेव शिंत्रे, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, गणेश ढाकणे, धोंडीराम कुंभार, संभाजी नागरगोजे, दीपक मनेरे, शुभम भोसले, निंबा जाधव, जाधव सर, श्रीहरी भोंडे, राजेश चौधरी, विजय कांबळे, रंजीत घुमरे, हनुमंत घुगे, आप्पा झांबरे यांच्यासह रहाटणी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles