Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी ते पिंपळे सौदागरला जोडणारा समांतर पुल वाहतुकीसाठी खुला होणार...

PCMC : पिंपरी ते पिंपळे सौदागरला जोडणारा समांतर पुल वाहतुकीसाठी खुला होणार – उषा वाघेरे पाटील

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर या दोन गावांना जोडणारा पवना नदीवर नुतन समांतर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पुलाचे संपुर्ण बांधकाम पुर्णत्वास आले असून तो लवकरच नागरिकांच्या वाहतुकीस व दळणवळणास खुला करण्यात येणार आहे. (PCMC)

आज या पुलाच्या कामाची मनपा स्थापत्य विभागाचे अधिकारी वर्ग व कंत्राटदार यांच्या समवेत माजी नगरसेविकाउषा संजोग वाघेरे पाटील तसेच युवा नेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांनी पाहणी केली.


पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर या पुलाचे अंतिम कामे लवकर पुर्ण करून तो लवकरच नागरिकाना खुला करून द्यावा अशी सूचना देखील त्यांनी दिली. सदर पुल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर नक्कीच वाहतुकीची समस्या कमी होऊन नागरिक वाहतूक कोंडी पासून सुटकेचा निश्चास घेतील अशी प्रतिक्रीया त्यानी यावेळी दिली. (PCMC)

संबंधित लेख

लोकप्रिय