पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : मनपाच्या ड प्रभागाच्या वतीने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान राजा ,जागा हो लोकशाही चा धागा हो अशा वेगवेगळ्या घोषणा देऊन, उपस्थित नागरिकांना व कर्मचारी यांना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भयमुक्त मतदान मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले. समृध्द लोकशाहीसाठी जनतेच्या प्रश्नाची जाण असलेल्या उमेदवारांना मतदान करा. मतदानाला शासन सुट्टी देते, याचा उपयोग भटकंती न करता.किंवा तिर्थयात्रेला न जाता आपला पवित्र मतदानाचा हक्क बजवावा, असे आव्हान श्रीराम डुकरे यांनी केले. PCMC NEWS
वंश, जात,धर्म, समुदाय, भाषा यांच्या प्रभावाखाली न पडता मतदान करू.अशी बेसिक्सचे टिमचे सुखदेव लोखंडे यांनी राजमाता जिजाऊ उद्यान (PCMC) येथे मतदान जनजागृतीद्वारे नागरिकांना शपथ दिली.
यावेळी (PCMC) क्षेत्रीय अधिकारी डॉ. अंकुश जाधव, सहा.आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी शांताराम माने, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले, आरोग्य निरीक्षक रेश्मी तुंडूळवार यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड इन्चार्ज सुखदेव लोखंडे, श्रीराम डुकरे, सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : मनपा ड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने निर्भय मतदान जागृती शपथ
---Advertisement---
- Advertisement -