Thursday, February 13, 2025

PCMC : पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्याशिवाय लग्न करायचेच नाही

प्रतिभा महाविद्यालयात महिला दिनी चर्चा सत्र

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १४ – प्रतिभा वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात स्टाफ अकॅडमी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च २०२४ रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी ‘चांगले जगायचे कसे’  याविषयी मान्यवरांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. PCMC

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पिपंरी चिंचवड येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजेश थिटे, त्यांचे सहकारी हेमंत पाटील आणि पुणे विद्यापीठातील गणित विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. निरूपमा भावे उपस्थिती होत्या.

प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते राजेश थिटे, प्रा.डॉ.निरूपमा भावे, प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळुंज, उपप्राचार्या डॉ.क्षितिजा गांधी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ.जयश्री मुळे, संयोजिक प्रा.जयश्री कांबळे आणि प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम यांनी केले. PCMC

प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळुंज यांनी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ आणि पुस्तक देऊन केला. स्वागत प्रा.रसिका पाटील, राजेश पाटील यांचा परिचय डॉ.जयश्री मुळे व प्रा.डॉ.निरूपमा भावे यांचा डॉ.क्षितिजा गांधी यांनी करून दिला.

श्री.राजेश थिटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आर्ट ऑफ लिविंग याचे महत्त्व किती आहे. आपले जीवन चांगल्या प्रकारे जगायचे असेल तर आपण दररोज ध्यान धारणा केली पाहिजे” ह्याचे प्रात्यक्षिक दिले.

प्रा.डॉ.निरूपमा भावे यांनी आपली जडण घडण कशी झाली हे सांगताना,
“त्यांना इंजिनिअर व्हायचे होते. पण त्याकाळात मुली त्या शाखेत शिक्षण घेत नसल्यामुळे वडिलांनी परवानगी दिली नाही, मग त्यांना गणित विषय आवडीचा असल्याने गणितात पुढे पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्याशिवाय लग्न करायचे नाही,अशी घरच्यासमोर अट ठेवली होती. पुढे लग्नानंतर त्यांचे पती देखील प्राध्यापक असल्यामुळे पुढील शिक्षण, मुलाचे संगोपन, त्यानंतर त्यांना आवडीचे सायकलिंग हे सहज जोपासता आले. त्यांनी आपला ७५ वाढदिवस पुणे ते कोलकत्ता असा सायकल प्रवास करून साजरा केला होता.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळुंज यांनी त्यांना बंगरूळ येथे श्री श्री रवी शंकर गुरुदेव यांचा आलेला अनुभव सांगितला. प्रा.भावे आणि प्रा. डॉ. निरूपमा भावे यांचे त्यांच्या जडण घडणीतील स्थान कसे आहे हे सांगताना ते भारावून गेले. आजही त्यांना भावे दांपत्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची महती सांगितली. ‘नसतेस घरी तू जेव्हा ‘ या काव्यपंक्तीने जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून समारोप केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अमिता देशपांडे यांनी केले.

whatsapp link

हे ही वाचा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

Related Articles

- Advertisement -

Latest Articles