कामगार दिनानिमित्त कष्टकरी कामगारांना ‘श्रमप्रतिष्ठा ‘ पुरस्काराचे वितरण (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक कंपन्यांची स्थापना झाल्या त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडसह औद्योगिककरणामुळे पुणे जिल्ह्यामध्येही कारखान्यात खूप मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने कामगारांनी काम केले. त्याकाळी त्यांना कामगार म्हणून विविध कामगार कायद्याद्वारे लाभ मिळाला. (PCMC)

मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. कामगाराची स्थिती आणि कामगाराची व्याख्या बदलत चाललेली आहे. कामगार कामगार चळवळ क्षीण होत चालली असून कामगार चळवळीचे ज्योत पुन्हा तेवत ठेवण्याची गरज असल्याचे मत कामगार प्रशिक्षक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आयोजित १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भव्य मेळावा व कष्टकरी कामगारांना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. (PCMC)
यावेळी महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, श्रमश्री बाजीराव सातपुते, कामगार नेते अरुण गराडे, कवी प्रभाकर वाघोले, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र छाबडा, उपाध्यक्ष राजेश माने, मनपा सदस्य किसन भोसले, सदस्य सलीम डांगे, लाला राठोड, सुनील भोसले, रुक्मिणी जाधव माधुरी जलमुलवार, अश्विनी मालुसरे, मुमताज शेख, माया शेटे, वंदना चव्हाण विजय पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बांधकाम कामगार – लक्ष्मी पवार, रिक्षाचालक- अविनाश पाटील, रंग कामगार व कलाकार – गजानन बाजड ,घरेलू कामगार – सारिका मिसाळ, गटई टपरीधारक – रोहिदास सातपुते, दगडखान कामगार – स्वाती पवार यांना श्रम प्रतिष्ठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
बाजीराव सातपुते यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासह भारतातील आणि जगातील कामगार चळवळीचा इतिहास मांडत कामगार चळवळीचे महत्त्व सांगितले. (PCMC)
पुढे सदाफुले म्हणाले की कष्टकरी हा नेहमीच उपेक्षित राहिलेला आहे अशा कष्टकऱ्यांना समोर आणून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचे आणि ते सोडवण्यासाठी काम आपण करत आहात अशा लोकांना सन्मानित केल्यानंतर आम्ही स्वतःला कृतज्ञ समजतो. कष्टकऱ्यांच्या या सत्काराने आमचे हात पावन झाले आहेत.
अशा कष्टकरी कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे कार्य पुढं घेऊन जात आहेत.
नखाते म्हणाले की १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कामगार कायदे टिकवून टिकवून ठेवण्याची आणि तसे प्रयत्न करण्याची आपली गरज आहे केंद्र सरकार जे कामगार कायदे लाभाचे हिताचे होते ते रद्द करून चार श्रम संहिता आणल्या आहेत त्याला विरोध करणे गरजेचे आहे अन्यथा कामगार म्हणून आपले अस्तित्व धोक्यात येणार आहे .
प्रस्तावना महादेव गायकवाड यांनी केले तर आभार किरण साडेकर यांनी मांडले.