Tuesday, February 11, 2025

PCMC : मराठा आंदोलकांनी अंबादास दानवे यांचा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवून केला निषेध

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.27- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे वायसीएम रुग्णालयात भेटीसाठी आले असताना सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला. ‘अंबादास दानवे’ परत जा’, मराठ्यांना आरक्षण दिलेच पाहिजे अशा घोषणा त्यांनी दिल्या.

राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे,त्याच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड शहरात निषेध आंदोलने सुरू आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे या आंदोलनाला, मागणीला धार आली आहे, पिंपरीमध्ये मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आक्रमक झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी आरक्षण मागणीच्या घोषणा सुरूच ठेवल्या होत्या.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles